shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मातंग योद्धा प्रतिष्ठान यांच्या वतीने १० वी.१२ वी गुणवंत विद्यार्थ्यांचा गूणगौरव आणि सन्मान सोहळा.


मातंग योद्धा प्रतिष्ठान  यांच्या वतीने  १० वी.१२ वी गुणवंत विद्यार्थ्यांचा गूणगौरव आणि सन्मान सोहळा.
फोटो ओळ: बावडा येथील मातंग समाजातील १० वी,१२वी  चे गुणवंत विद्यार्थी.

बावडा:  (ता. इंदापूर )इयत्ता दहावी आणि बारावी बोर्ड परिक्षा उत्तीर्ण होऊन उत्तुंग यश संपादन करून समस्त मातंग समाजाची मान अभिमानाने ताट करणा-या लहुकन्येचे आणि लहुपुत्र यांचे मातंग योद्धा प्रतिष्ठान बावडा ता. इंदापुर आणि समस्त समाज यांच्या वतीने लोकशाहीर आण्णाभाऊ साठे स्मारक या ठिकाणी गुणगौरव करण्यात आला.यावेळी मातंग समाजातील जेष्ठ नागरिक , समाज बांधव आणि भगिनीं खुप मोठ्या संख्येत उपस्थित होते. यावेळी  बारावी मध्ये उत्तुंग यश मिळविलेले विद्यार्थी कु .अश्विनी गायकवाड, सौरभ गायकवाड 
क्रीश गायकवाड, ऋतुराज भिसे, किरण गायकवाड, राजनंदिनी गायकवाड, सुरज सकट, पूनम गायकवाड, आदित्य लोखंडे 
इयत्ता १० वी मधिल
सुकन्या गायकवाड, रितेश गायकवाड, मकरंद गायकवाड, गगन गायकवाड, आदित्य गायकवाड, ओंकार गायकवाड सायली खंडागळे, चंदा गायकवाड, नेहा गायकवाड, साक्षी गायकवाड, ऋतुजा गायकवाड, प्रथमेश गायकवाड या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या शुभहास्ते सत्कार करण्यात आले..या कार्यक्रमाचे  आयोजन समस्त मातंग समाजातील मातंग योद्धा प्रतिष्ठान च्या कार्यकर्त्यांनी केले.असाच प्रोत्साहन देण्यासाठी गुणगौरव कार्यक्रम दरवर्षी घेण्यात येईल असे कार्यकर्ते यांनी आश्वासित केल.


close