shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

हॉटेलवर छापा टाकुन देशी विदेशी दारूचा मुद्देमाल जप्त



प्रतिनिधी : महेश चव्हाण

 नगर दि . १५ /  मा. पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला साहेब यांनी श्री शिशिरकुमार देशमुख, सहायक पोलीस निरीक्षक, नगर ता. पोस्टे यांना नगर तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैध दारु विक्रीवर कारवाई करण्याच्या सुचना दिल्या.
त्यानुसार श्री शिशिरकुमार देशमूख, सहायक पोलीस निरीक्षक, नगर तालुका पोलीस स्टेशन यांनी  पोउनि युवराज चव्हाण, पोकॉ/कमलेश पाथरुट, पोकॉ/जयदिप बांगर, सोमनाथ वडणे, संभाजी बोराडे यांचे अवैध धंद्यावर कारवाई करणेकामी पथक तयार केले. 

त्यानुसार सदर पथक हे पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैध धंद्यावर करवाई करणेकामी पेट्रोलींग करीत असतांना श्री शिशिरकुमार देशमुख, सहायक पोलीस निरीक्षक यांना गुप्त बातमी मिळाली की, वाळुंज बायपास येथे सोलापूर रोडवर आरती हॉटेल येथे मोठया प्रमाणात देशी व विदेशी दारुची विक्री चालू आहे तुम्ही तात्काळ जावून त्याच्यावर कारवाई करा असा आदेश दिल्याने सदर पथक वाळुंज बायपास येथे जावून आरती हॉटेल येथे खात्री केली असता तेथे एक इसम देशी व विदेशी दारुची विक्री करताना दिसला सदर पथकाची खात्री पटताच आरती हॉटेलवर छापा टाकून इसम नामे उध्दव सोपान मोरे रा. वाळुंज ता. जिल्हा अहमदनगर यास ताब्यात घेवून तो बसलेल्या ठिकणाची झडती घेतली त्याठिकाणी एकुण 46,252/- रुपयेचे देशी व विदेशी दारुचा मोठया प्रमाणात साठा मिळून आला. त्याप्रमाणे पोकॉ/कमलेश पाथरुट यांनी नगर ता. पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.

सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला साो. पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्री. प्रशांत खैरे, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. उप विभागीय पोलीस अधिकारी, श्री संपतराव भोसले साो.,  सपोनि शिशिरकुमार देशमुख, पोउनि युवराज चव्हाण, पोकॉ/कमलेश पाथरुट, जयदिप बांगर, सोमनाथ वडणे, संभाजी बारोडे, यांचे पथकाने केलेली आहे.
close