बांडेवाडी शाळेत पहिल्या दिवशी प्रवेशोत्सव , नवागतांचे स्वागत पाठ्यपुस्तके , गणवेशासह , शालेय साहित्य व खाऊ वाटप.
इंदापूर प्रतिनिधी: दि 15 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बांडेवाडी येथे नवीन शैक्षणिक वर्षाचे पहिल्या दिवशी इयत्ता पहिलीत दाखल झालेल्या व इतर सर्व मुलांचे पाठ्यपुस्तके , गणवेश , शैक्षणिक साहित्य , गोड खाऊ , गुलाब पुष्प देवून उत्साहात स्वागत करण्यात आले.
शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांनी 100% उपस्थिती राहिली. पालक व मुले यांच्यामध्ये उत्साह दिसून आला.
यावेळी माजी सरपंच व सदस्य भालचंद्र बांडे , शाळा समिती सदस्य सचिन बांडे , राजू मुलाणी , भाऊसाहेब कदम , शरद पवार , नंदकुमार कुंभार , अंगणवाडी सेविका सुनंदा पोंदकुले , शिक्षिका ललिता वाघमोडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापक संतोष हेगडे यांनी केले.

