shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

ज्योती क्रांती को. ऑ. क्रेडिट सो. ली. यांच्यातर्फे १० वी व १२ वी च्या उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न



प्रतिनिधी: सुर्यकांत होनप 

करमाळा: दि. १५/ ज्योतिक्रांती को. ऑ. क्रेडीट सो.ली. शाखा करमाळा यांच्या गुणवंता चा गौरव या संकल्पनेतून पहिल्यांदाच घेण्यात आलेला गुणगौरव सोहळा यशस्वीरित्या पार पडला. करमाळा शहर व तालुक्यातील इ. 10 व 12 वि च्या शालांत परीक्षेत यश संपादन केलेल्या एकूण 31 विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा पार पडला.

 या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे 
यशकल्यानी ग्रामीण सेवाभावी संस्था चे अध्यक्ष श्री. गणेशभाऊ करे पाटील यांनी उपस्थिती दर्शविली यावेळी त्यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन करत विद्यार्थ्यांना पुढील करीअर साठी कोणत्या क्षेत्राची निवड करावी याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी अर्थ क्षेत्रात काम करत सामाजिक आणि शैक्षणिक बांधिलकी जोपासण्याचे काम ज्योति क्रांती परिवार करत असल्याने त्याचेही कौतुक केले. यावेळी करमाळा शहर व तालुक्यातील सर्व गुणवंत विद्यार्थी व त्यांचे पालक व त्यांचे शिक्षक मोठया संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन ज्योतिक्रांती मल्टिस्टेट शाखा करमाळा यांच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे अंतर्गत लेखापरीक्षक श्री. महेश मोहोळकर, श्री. संदिपान हजारे, श्री. अरविंद हजारे, वसूली अधिकारी श्री. अक्षय हजारे, उपस्थित होते. तसेच शाखाधिकारी प्रकाश सोरटे, CPS निरीक्षक अमोल राठोड, पृथ्वीराज देशमुख, बाळासाहेब देवकर, अमरनाथ आव्हाड, विवेक साळवे, निखिल ढाळे, अरुण टांगडे, संतोष कांबळे इं. उपस्थित होते. यावेळी आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते सेवानिवृत्त शिक्षक पठाण सर व बागल सर यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.

कार्यक्रममाचे सुत्रसंचालन व प्रास्तविक श्री. रफिक सलीम शेख यांनी केले. यावेळी ज्योतिक्रांती संस्था समाजातील प्रत्येक घटकासाठी अर्थ व समाज सेवेसाठी सदैव तत्पर असल्याची ग्वाही कर्मचारी वर्गातून देण्यात आली. यश संपादन केलेले सर्व विद्यार्थी पुढील आयुष्यात मोठ्या पदांवर जावेत अशा शुभेच्छा सर्वांकडून विद्यार्थ्यांना देण्यात आल्या.
close