shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जि. प. प्रा. शाळा कारंडेवाडी येथे नवीन शैक्षणिक वर्षात गुलाब पुष्प व गोड खाऊ देऊन नवागतांचे स्वागत .

जि. प. प्रा. शाळा कारंडेवाडी येथे नवीन शैक्षणिक वर्षात गुलाब पुष्प व गोड खाऊ देऊन नवागतांचे स्वागत .
इंदापूर प्रतिनिधी: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कारंडेवाडी येथे नवीन शैक्षणिक वर्षात नवागतांचे स्वागत गुलाब पुष्प व गोड खाऊ देऊन करण्यात आले. शाळा प्रवेशोत्सव मध्ये सर्व मुलांनी फुगे उडवून आनंद साजरा केला. इयत्ता पहिली ते चौथी मधील सर्व मुलांना मोफत पाठ्यपुस्तके,शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांची शंभर टक्के उपस्थिती राहिली.*
*निमसाखर ग्रामपंचायत सदस्य शेखर  पानसरे यांनी नवीन शैक्षणिक वर्षाच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.*
*यावेळी  शाळा व्यवस्थापन सदस्या सौ.प्रियांका भोंग,  महेश कारंडे,.हनुमंत कारंडे ,.संजय शेळके अंगणवाडी सेविका सुमन कारंडे, मदतनीस जया शिंदे उपशिक्षक मंगेश शेंडे उपस्थित होते. 
कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापक रिहाना सय्यद यांनी केले.*
close