*कदम विद्यालयात गुलाबपुष्प व पुस्तके देऊन केले नवागतांचे स्वागत*
इंदापूर प्रतिनिधी: रयत शिक्षण संस्थेच्या सौ. कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालय व ज्युनिअर कॉलेज मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. तसेच पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शासनाच्या मोफत पाठ्यपुस्तक योजनेअंतर्गत क्रमिक पुस्तकांचे वाटप करण्यात आले.
विद्यालयाच्या शाळा समितीचे सदस्य म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर ,माजी नगरसेवक श्रीधर बाब्रस ,माजी नगराध्यक्ष विठ्ठल ननवरे व यांची रयत शिक्षण संस्थेमार्फत नियुक्ती झाल्याबद्दल विद्यालयाच्या वतीने प्राचार्य भास्कर वाबळे यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्रदीप गारटकर यांनी विद्यार्थी व शिक्षकांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. विद्यालयाच्या भौतिक सुविधांसाठी कुठेही कमी पडणार नाही अशी ग्वाही दिली. विद्यार्थ्यांनी मात्र अध्ययन करत असताना कला क्रीडा सांस्कृतिक प्रकारामध्येही सक्रिय सहभाग घेऊन आपल्या कलागुणांना वृध्दींगत करावे असे आवाहन केले.
यावेळी इंदापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामराजे कापरे,पालक शिक्षक संघाचे मारोती जोगदंड, माजी विद्यार्थी सुनिल जाधव व अनेक पालक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील मोहिते यांनी केले पर्यवेक्षिका पुष्पा काळे यांनी आभार मानले.

