निमसाखर येथील एन. ई. एस. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात नवागताचे विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन केले स्वागत.
इंदापूर प्रतिनिधी: एन. ई. एस. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय निमसाखर ता. इंदापूर जि. पुणे येथे शैक्षणिक वर्ष 2023 -24 इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प, लेखणी, खाऊ व मोफत पाठ्यपुस्तक देऊन उत्साहात स्वागत करण्यात आले. त्यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष संजय सूर्यकांत रणवरे उर्फ पप्पू पाटील तसेच संस्थेचे सचिव धनंजय सूर्यकांत रणवरे तसेच विद्यालयाचे प्राचार्य चंद्रकांत गोपाळराव रणवरे, पर्यवेक्षक मधुकर शंकरराव खरात, सर्व शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. त्याचवेळी ग्रामस्थ अविनाश रणवरे, शब्बीर शेख, भारत कोरडे, व पिनू जाधव हेही उपस्थित होते. प्रमुख मान्यवरांच्या हस्ते इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके, गुलाब पुष्प, व लेखणी देऊन व खाऊ वाटप करून मान्यवरांच्या हस्ते त्यांचे मनःपूर्वक स्वागत करण्यात आले. आजच्या विद्यार्थ्यांनी व्यायाम ,आहार व शिस्तीला फार महत्त्व दिले पाहिजे . मोबाईलचा वापर कमी करून अभ्यासाकडे लक्ष दिले पाहिजे.आई -वडील गुरुजनांची व वडीलधाऱ्या माणसांची आज्ञा पाळली पाहिजे. असा शुभ संदेश संस्थेचे सचिव धनंजय सूर्यकांत रणवरे यांनी आपल्या मनोगतातून दिला. संस्थेचे उपाध्यक्ष संजय सूर्यकांत रणवरे व प्राचार्य चंद्रकांत गोपाळराव रणवरे यांनी नूतन शैक्षणिक वर्षानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. त्यावेळी पर्यवेक्षक खरात सर व चौधर सर यांनी नवोदित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आशा पर्वते व स्वप्नाली पाटील मॅडम यांनी सुंदर वर्ग सजावट केली तसेच त्यावेळी हनुमंत तोडकर सरांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर आशा पर्वते मॅडम यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभागाने केले. तर सूत्रसंचालन आजिनाथ मलगुंडे सर यांनी केले.

