वडापुरी शाळेत पहिल्या दिवशी प्रवेशोत्सव , नवागतांचे स्वागत .
पाठ्यपुस्तके , गणवेशासह , शालेय साहित्य व खाऊ वाटप.
इंदापूर प्रतिनिधी: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडापुरी येथे नवीन शैक्षणिक वर्षाचे पहिल्या दिवशी इयत्ता पहिलीत दाखल झालेल्या व इतर सर्व मुलांचे पाठ्यपुस्तके , गणवेश , शैक्षणिक साहित्य , गोड खाऊ , गुलाब पुष्प देवून उत्साहात स्वागत करण्यात आले.
शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांची मोठ्या संख्येने उपस्थिती राहिली. पालक व मुले यांच्यामध्ये उत्साह दिसून आला.
यावेळी शालेय व्यवस्थापन समिती सदस्य रणजीत चंदनशिवे, राजेंद्र चंदनशिवे, श्री काळुंके, तुषार चंदनशिवे, छाया पासगे, दादा चंदनशिवे, काजल पवार, रेखा गायकवाड, मंदाकिनी गायकवाड अंगणवाडी सेविका माधुरी कदम, शिक्षिका मनिषा मोरे,प्रतिभा गर्कळ उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन श्यामसुंदर माने यांनी केले.

