shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कौठळी शाळेतील मुलांना पहिल्याच दिवशी मिळाली मोफत पाठ्यपुस्तके व गणवेश

  कौठळी शाळेतील मुलांना पहिल्याच दिवशी मिळाली मोफत पाठ्यपुस्तके व गणवेश
इंदापूर प्रतिनिधी: दिनांक १५ जून आज राज्यातील बहुतांश शाळा सुरू झाल्या.कौठळी शाळेत इयत्ता १ ली मध्ये दाखल झालेल्या मुलांचे फुगे,चॉकलेट, सचित्र बालमित्र(उजळणी)देऊन स्वागत करण्यात आले.नंतर शाळेतील सर्व मुलांना मान्यवर व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सदस्यांच्या हस्ते मोफत पाठ्यपुस्तके देण्यात आली.सर्व मुलींना मोफत गणवेश वाटप करण्यात आले.सर्व मुलांना आज शालेय पोषण अंतर्गत भात व गोड शिरा देण्यात आला.कौठळी शाळेत नव्याने रुजू झालेले शिक्षक अमित भोंग सरांचा सन्मान शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने करण्यात आला.या कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष चंद्रकांत माने,नामदेव मारकड,शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य सोमनाथ पाटोळे,बापूराव मारकड,अमोल मोरे,तुकाराम मारकड, वाल्मिक पिसाळ,अंकुश चितारे,आदिक माने,तुकाराम मारकड,उमेश चितारे,सदस्या रुपाली मोरे,चारूशीला मोहिते, कविता जगताप,राधिका मोरे यांसह पालक,ग्रामस्थ उपस्थित होते.सूत्रसंचालन भारत ननवरे यांनी केले तर आभार शिक्षिका आरती गायकवाड यांनी मानले.शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष साहेबराव पिसाळ यांनी कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.
close