कालठण नं. १ शाळेत पहिल्या दिवशी प्रवेशोत्सव , नवागतांचे स्वागत
इंदापूर प्रतिनिधी: दि 15 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कालठण नं. १ येथे नवीन शैक्षणिक वर्षाचे पहिल्या दिवशी इयत्ता पहिलीत दाखल झालेल्या व इतर सर्व मुलांचे पाठ्यपुस्तके , फुगे,गुलाब पुष्प देवून उत्साहात स्वागत करण्यात आले.
पालक व मुले यांच्यामध्ये उत्साह दिसून आला.
यावेळी शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष अण्णासाहेब धोत्रे, हनुमंत पाटील, संतोष सपकळ, बबन चोरगे, महादेव भोई, अण्णा पाडुळे, संतोष जगताप माजी उपसरपंच ,शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र जगताप, प्रशांत घुले गुरुजी, बोराटे गुरुजी, राऊत मॅडम इत्यादी उपस्थित होते.

