shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गौराईमळा शाळेत इयत्ता पहिली प्रवेश उत्साहात संपन्न.

गौराईमळा  शाळेत इयत्ता पहिली प्रवेश उत्साहात संपन्न.
     इंदापूर प्रतिनिधी: जिल्हा परिषद शाळा गौराईमळा येथे शाळेत इयत्ता पहिली प्रवेश  उत्साहात संपन्न , यामध्ये पुढील शैक्षणिक वर्षातील नवीन मुलांचे स्वागत, मुलांची बौद्धिक, शारीरिक आणि इतर क्षमता तपासणी केली गेली. या वेळी शालेय समितीचे अध्यक्ष श्री. विलास शिंगाडे यांच्या शुभहस्ते गणवेश वाटप व पुस्तक वाटप करण्यात आले.विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. आनंददायी व उत्साही वातावरणामध्ये प्रवेश उत्साह साजरा करण्यात आला शेवटी मुलांना गोड जेवन देऊन मुलांचा आनंद व्दिगुणित करण्यात आला*
         _*याप्रसंगी प्रस्ताविक मुख्याध्यापक प्रताप शिरसट यांनी केले यावेळी  ग्रामपंचायत सदस्या प्रियांका जाधव मनिषा शिंगाडे  अंगणवाडी सेविका सुनिता सोनवणे कल्पना जाधव मॅडम व   इतर  पालक  उपस्थितीत होते शेवटी पठाण मॅडम यांनी आभार मानले*.
close