प्रतिनिधी : संजय वायकर
नगर : ३० / डॉ. सुदाम गणपत दवंडे यांची नुकतीच आय आय टी चेन्नई येथे रसायनशास्त्र विषयात प प्राध्यापक पदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे अहमदनगर जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रातून अभिनंदन व कौतूक होत आहे.
दवंडे यांचे मूळ गाव धरणगाव ता .कोपरगाव आहे.ते एक सामान्य शेतकरी,कष्टकरी कुटुंबातील असून त्यांच्या मागे कुठलाही शिक्षणाचा वारसा नसताना शिक्षणाविषयी असणारे प्रेम, जिद्द व चिकाटी याच्या जोरावर आज त्यांनी हे यश संपादन केले आहे. आय आय टी ही भारतातील शिक्षण व्यवस्थेतील खूप मोठी इन्स्टीटयूट आहे. त्यांचे शालेय व माध्यमिक शिक्षण हे त्यांच्या गावी झाले व उच्च माध्यमिक व पदवी पर्यंतचे शिक्षण कोपरगाव येथे झाले .
पदव्युत्तर शिक्षण हे अहमदनगर महाविद्यालय अहमदनगर येथे झाले. पदव्युत्तर शिक्षण चालू असताना पहिल्यापासूनच संशोधनाची खूप आवड होती. त्यामुळे त्यांना संशोधनासाठी लागणारी जीआरएफ नेट परीक्षा ही ती पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करत असतानाच उत्तीर्ण झाले . कुटुंबाची परिस्थिती बेताची असल्यामुळे पेमराज सारडा महाविद्यालय येथे दोन वर्ष प्राध्यापकाची नोकरी केली.
त्यांची संशोधनाची आवड स्वस्थ राहू देत नव्हती. त्यामुळे नोकरी सोडून पुन्हा संशोधन करण्याचे ठरविले . त्यामुळे त्यांनी नंतर पीएचडी साठी आय आय एस सी आर, भोपाळ या ठिकाणी प्रवेश घेतला . दवंडे यांचे विविध आंतरराष्ट्रीय ख्यातनाम आंतरराष्ट्रीय नियतकालिकामध्ये शोध निबंध चांगल्या गुणवत्तेसह प्रसिद्ध झाले. २०१३ मध्ये त्यांना पीएचडी पदवी प्राप्त झाली. नंतर त्यांची आयसीटी मुंबई येथे प्राध्यापक पदी नियुक्ती झाली. त्या ठिकाणी त्यांनी त्यांच्या संशोधनाच्या जोरावरती अल्पावधीतच पीएचडी गाईड शिफ्ट मिळवली व त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहा विद्यार्थी संशोधनासाठी प्रवेशित झाले
सदर काम चालू असताना आयटी सारख्या इन्स्टिट्यूट मध्ये त्यांना रस वाढू लागला व त्यांनी नंतर त्या ठिकाणी जाण्याचे ठरविले. पहिल्या प्रयत्नातच दवंडे यांनी यश प्राप्त केले . सर्व बिकट परिस्थितीवर मात करून शिक्षण हे सर्व सामान्याचे व गरिबांसाठी आहे हे त्यांच्या जीवन प्रवासातून सिद्ध केले व विद्यार्थ्यांसाठी एक आदर्श निर्माण केला आहे.अहमदनगर जिल्ह्यातून सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.
अहमदनगर जिल्ह्यासाठी एवढ्या मोठ्या शिक्षण संस्थेमध्ये जाणारे ते एकमेव प्राध्यापक असून सुदाम दवंडे यांच्यावर जिल्ह्यातील सर्व शिक्षण क्षेत्रातुन शिक्षण संस्थेतून क्षेत्रातून मित्रपरिवाकडून शुभेच्छांचा वर्षाव होतआहे.

