इंदापूर ज्ञानदीप पॅरामेडिकल कॉलेजच्या दोन विद्यार्थ्यांनी मिळवले पोलीस भरतीमध्ये यश.
प्रतीक गोडगे व अजय राखुंडे डीएमएलटी या अभ्यासक्रमाला घेत होते प्रशिक्षण.
इंदापूर प्रतिनिधी: अनुसया सामाजिक प्रतिष्ठान संचलित ज्ञानदीप पॅरामेडिकल कॉलेज इंदापूर येथे डीएमएलटी या अभ्यासक्रमाला प्रशिक्षण घेत असताना कॉलेजच्या प्रतीक आप्पासाहेब गोडगे तसेच अजय बाळासाहेब राखुंडे या दोन विद्यार्थ्यांनी पोलीस भरतीच्या परीक्षेत भरघोस यश संपादन केले. या गुणवान विद्यार्थ्यांचा अनुसया सामाजिक प्रतिष्ठान संचलित ज्ञानदीप पॅरामेडिकल कॉलेज इंदापूर चे संस्थापक अध्यक्ष सागर जाधव तसेच सहशिक्षक यांच्या वतीने सत्कार करण्यात आला व त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या. ज्ञानदीप पॅरामेडिकल कॉलेज इंदापूर येथे शिक्षण घेत असलेल्या प्रतीक आप्पासाहेब गोडगे या विद्यार्थ्याचे मीरा-भाईंदर पोलीस तसेच अजय बाळासाहेब राखुंडे या विद्यार्थ्याचे रायगड पोलीस या ठिकाणी पदी निवड झाले असल्याची माहिती अध्यक्ष सागर जाधव यांनी दिली.

