प्रतिनिधि : महेश चव्हाण
नगर : 8 / कोठला परीसरातून स्टेट बँकेकडे जाताना नवीन उड्डान पुलाच्या अलीकडून दि . 8 जून रोजी रात्री पायी जाणारा पादचारी भरत विलास गर्जे वय 36 वर्षे धंदा चालक रा. बारादरी ता. नगर जि. अहमदनगर यास तीन अनोळखी इसम मो .सा. वरून येऊन पादचारीस आडवून शिवीगाळ, दमदाटी करून त्यांचे ताब्यातील रोख रक्कम 1,000/- रूपये व ओपो कंपनीचा एफ 5 मॉडेलचा सिल्वर रंगाचा मोबाईल बळजबरीने फिर्यादीचे संमतीशिवाय फिर्यादीस दगडाने मारहाण करून चोरून नेऊन पळून गेले आहे बाबत भिंगार कॅम्प पो स्टे गु र नं 349/2023 भा द वि 394,324, 323, 504, 506,34 अन्वये दि. 09/06/2023 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे...
भिंगार कॅम्प पो स्टे चे सपोनि. दिनकर मुंडे यांना गोपनिय माहीती मिळाली कि, स्टेट बँक चौक परीसरात ज्या आरोपींनी मारहाण करून लुटमार केली आहे त्यामधील एक इसम हा सध्या एल आय सी परीसरात थांबलेला आहे आता गेल्यास मिळून येईल अशी खात्रीलायक बातमी मिळाल्याने सपोनि.श्री.दिनकर मुंडे यांनी तात्काळ एक पथक तयार करून सापळा लावला असता एक संशयीत इसम दिसून आला त्यास ताब्यात घेतले त्यास त्याचे नाव व गाव विचारले असता त्याने त्याचे नाव 1) कविराज शिवराज नायडू वय 21 वर्षे रा. कोंबडीवाला मळा, सोलापुर रोड, अहमदनगर असे असल्याचे सांगीतले. त्यास सदर गुन्ह्याबाबत विचारपुस केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली त्यास अधिक विश्वासात घेऊन विचारपुस केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केले तसेच त्याचे सोबत असलेल्या इतर साथीदारांबाबत विचारपुस केली असता त्याने त्यांची नावे 2) अरविंद अशोक पिल्ले वय 22 वर्षे रा. कवडे नगर, पाण्याचे टाकी जवळ, आलमगीर, भिंगार ता. जि. अहमदनगर 3.) शाहरूक चांद शेख वय 22 वर्षे रा. कवडे नगर, आलमगीर, भिंगार ता. जि. अहमदनगर असे असल्याचे सांगीतले. त्यानंतर सपोनि. मुंडे सो यांनी यातील उर्वरीत दोन्ही आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणावरून ताब्यात घेऊन त्यांचे कडे विचारपुस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केले आहे. सदर गुन्ह्यात आरोपींनी वापरलेली 50,000/- रू किं चा एक एच एफ डिलक्स कंपनीची मोटर सायकल नं एम एच 16 बी एस 8936 व रोख रक्कम 1,000/- असा एकून 51,000/- रू कि चा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. राकेश ओला, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. प्रशांत खैरे, मा. उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. अनिल कातकडे, सहा. पोलिस निरीक्षक श्री. दिनकर मुंडे, पोसई / मंगेश बेंडकोळी, पोहेकाँ / रेवननाथ दहीफळे, पोहेकाँ/संदिप घोडके, पोना/राहुल द्वारके, पोना/दिलीप शिंदे, पोकाँ/रमेश दरेकर, पोकों/अमोल आव्हाड, मपोकाँ/तृप्ती कांबळे यांनी सदरची कारवाई केली आहे .

