shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सदाभाऊ खोत(मा. कृषी राज्यमंत्री )यांच्या "वारी शेतकऱ्यांची" या आंदोलनाला आले मोठे यश.

"खेड तालुक्यातील प्रदीर्घ प्रलंबित भामा आसखेड, चासकमान, प्रकल्प अंतर्गत चाकण,काळुस, मरकळ (२५) परिसरातील शेतजमिनीवर चाळीस वर्षांपूर्वी पुनर्वसनाचे टाकलेले शिक्के काढणे आणि सेझ प्रकल्प ग्रस्तांचा१५ टक्के परतावा प्रश्नांची मुंबई सह्याद्री अतिथीगृह येथेमा.मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मा.सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या बैठकीत सोडवणुकी संदर्भात झाला ऐतिहासिक निर्णय!"- झालेल्या निर्णयामुळे खेड तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण, निर्णयाबाबत शेतकऱ्यांनी केला जल्लोषात आनंद उत्सव!-मानले मुख्यमंत्र्यांचे आणि सदाभाऊ खोत यांचे आभार!"

सदाभाऊ खोत(मा. कृषी राज्यमंत्री )यांच्या "वारी शेतकऱ्यांची" या आंदोलनाला आले मोठे यश.

मा. राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी २२ मे २०२३ रोजी राज्यातील शेतकरी, शेतमजूर, ऊस वाहतूकदार, सरपंच परिषद यांच्या विविध प्रश्नांवर "वारी शेतकऱ्यांची" अशी पायी यात्रा काढली होती. त्या अनुषंगाने राज्यातील शेतकरी, ऊस वाहतूकदार तसेच सरपंच परिषद यांच्या विविध मागण्यांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे १४ मे२०२३ रोजी बैठक झाली. या बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये खेड तालुक्यातील महत्त्वाचे दोन ऐतिहासिक निर्णय घेण्यात आले.

   खेड तालुक्यातील चासकमान आणि भामासखेड धरण पुनर्वसन अंतर्गत चाकण ,काळुस ,मरकळ, या भागातील२५ गावातील शेत जमिनीवर चाळीस वर्षांपूर्वी टाकलेले शिक्के लाभ क्षेत्रात येत नसल्यामुळे, आणि कालवे रद्द झाल्यामुळे शिक्के काढून शेतकऱ्यांना जमिनी देण्याबाबत निर्णय घेण्यात आला.

       तसेच खेड - शिरूर येथील सेझ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा गेली १४ वर्षे प्रलंबित१५% परताव्याचा प्रश्नसंदर्भात खेड डेव्हलपर्स लिमिटेड कंपनीच्या (शेतकऱ्यांच्या कंपनीच्या) १४९ हेक्टर जमिनीचे औद्योगिक विकास महामंडळा कडूनच संपादन होऊन शेतकऱ्यांना चांगला मोबदला देण्याबाबत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. व त्याच्या त्वरित अंमलबजावणी बाबतआदेश मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे यांनी दिले.
      या बैठकीत अनेक समाधानकारक निर्णय झाल्यामुळे सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्यशासनाचे आभार मानले.

बैठकीस ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, कृषिमंत्री अब्दुल सत्तार, कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे, आमदार प्रवीण दरेकर, माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आमदार राजेंद्र पाटील - यड्रावकर, आमदार सुरेश धस, मुख्य सचिव मनोज सौनिक, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ नितीन करीर,महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा, सहकार विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेशकुमार, कृषी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अनुपकुमार रयत क्रांती संघटनेचे पदाधिकारी,उपस्थित होते.
     खेड तालुक्यातील  प्रश्नांसंदर्भात बैठकीसाठी मा. गजानन गांडेकर, सुभाष पवळे, बाळासाहेब दौंडकर, विश्वास पोटवडे, मिनीनाथ साळुंखे, विठ्ठलशेठ आरगडे, संतोष खलाटे, संतोष पवळे, प्रा. डॉ. बाळासाहेब माशेरे, काशिनाथ हजारे उपस्थित होते.

      तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रदीर्घ प्रलंबित प्रश्नांसंदर्भात मुख्यमंत्र्यांकडून महत्त्वाचे निर्णय झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून सर्वत्र जल्लोष साजरा केला जात आहे. काळुस येथे शेतकऱ्यांनी ग्रामदैवत काळेश्वराचे दर्शन घेऊन मिरवणूक काढून, फटाक्याची अतिशबाजी करत एकमेकांना पेढे भरून आनंदोत्सव साजरा केला. व मुख्यमंत्र्यांचे आणि सदाभाऊ खोत यांचे आभार व्यक्त केले.
close