shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्री छत्रपती महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना पालखी सोहळ्यात मान्यवरांकडून कौतुकाची थाप

श्री छत्रपती महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना पालखी सोहळ्यात  मान्यवरांकडून कौतुकाची थाप 
इंदापूर प्रतिनिधी: 
     जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात भवानीनगर येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या ५०  विद्यार्थ्यांनी स्वयंसेवक म्हणून काम करताना  वारकऱ्यांशी संवाद साधला,पायी वारी काळातील समस्या जाणून घेतल्या.प्लॅस्टिक, तंबाखू याविषयी जनजागृती केली तसेच पालखीतळावर भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लावून पोलिसांना मदत करून सामाजिक बांधिलकीचे
 दर्शन  घडविले. ५० विद्यार्थ्यांनी स्वयंसेवक म्हणून उत्कृष्ट काम केले. इंदापूर तालुक्याचे माजी राज्यमंत्री मा.आमदार दत्तात्रय भरणे , अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे  बारामती विभाग,वलचंदनगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक साळूंके ,PSI रतिलाल चौधर, छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक रणजित  निंबाळकर या सर्वच मान्यवरांनी  विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विध्यार्थ्यानी पालखी तळावरती वारकऱ्यांच्या सेवेसाठी करत असलेल्या कार्याचे तोंड भरून कौतुक केले.यावेळी 
 साळुंखे साहेबांनी प्राचार्य डॉ पांढरमिसे सरांना  स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करण्यासाठी महाविद्यालयात येण्याचे आश्वासन दिले.
   दि.20/6/2823रोजी स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी पालखी परिसराची स्वच्छता केली.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ प्रकाश पांढरमिसे सर, उपप्राचार्य डॉ संजय मोरे सर,या राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. बाबासाहेब चव्हाण सर प्रा. सुवर्णा बनसोडे मॅडम प्रा.रणनवरे मॅडम प्राध्यापक तरंगे मॅडम पवार मॅडम, कार्यालयीन अधीक्षक सुशील निंबाळकर,गणेश जाधव,विकास क्षत्रिय यावेळी उपस्थित होते.
close