भोसरी :-
आपल्या प्राचीन भारतीय संस्कृतीमध्ये ,परंपरेमध्ये योग साधना, ध्यान, धारणा, यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. आजच्या धक्का धक्कीच्या जीवनात योगाच्या माध्यमातून आपण आपले शरीर तंदुरुस्त ठेवू
शकतो. शिवाय मनावरही चांगली संस्कार करू शकतो.
मुलांवर चांगले संस्कार व्हावे योगाचे महत्त्व त्यांना समजावे,बालवयापासून योगाची सवय त्यांना व्हावी, चांगल्या आरोग्यविषयक सवय निर्माण व्हाव्यात यासाठी दि.२१ जून 2023 रोजी शाळेच्या प्रांगणात सकाळी ८:०० ते ९:३० या वेळेत "योग दिन "साजरा करण्यात आला.
सहज, सोपा, कोठेही कधीही करता येण्याजोगा व्यायाम प्रकार म्हणजे योग!
योगा म्हणजे काय, योगासने का करावी, योगासनाचे साधे उपयुक्त प्रकार, सूर्यनमस्कार कसे करावे, याचे मार्गदर्शन सौ. सायली संत यांनी सर्व उपस्थित विद्यार्थी व सहभागीना केले.
सूर्यनमस्कार, ताडासन, वृक्षासन, त्रिकोणासन, वज्रासन, पद्मासन, शशाकासन, शवासन, प्राणायाम, अनुलाम विलोम, कपाल भारती, ध्यान, इत्यादी योगाचे प्रकाराची त्यांची प्रात्यक्षिकासह माहिती दिली.
कार्यक्रमासाठी नारायण हट शिक्षण संस्थेचे सचिव प्रा. डॉ.बाळासाहेब माशेरे, अध्यक्ष संदीप बेंडुरे, संचालक रोहिदासगैंद, शिवरामकाळे, उज्वला थिटे, व इतर संचालकांचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य विजय चौगुले, सायली संत, प्रतिभा तांबे, नूतन मोहिते, उज्वला भुजबळ, तेजल पावडे, सुप्रिया राजगुरू, अश्विनी वायकर, प्रवीण भाकर या गुरुजनांचे मोलाचे सहकार्य झाले.
नारायण हट शिक्षण संस्थेच्या शाळेत नाविन्यपूर्ण व विविध अंगी उपक्रम राबविले जात असल्यामुळे मुलांवर चांगले संस्कार होत असून विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती चांगली होत आहे त्यामुळे या शाळेचा नावलौकिक परिसरात दिवसेंदिवस वाढत आहे.

