shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

निमसाखर येथे परमपूज्य सद्गुरु आनंदाश्रम स्वामी पायी पालखी सोहळ्याचे आनंदात स्वागत.

निमसाखर येथे परमपूज्य सद्गुरु आनंदाश्रम स्वामी पायी पालखी सोहळ्याचे आनंदात स्वागत.

निमसाखर एज्युकेशन सोसायटीचे एन. ई.एस. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय निमसाखर येथे संस्थेच्या व विद्यालयाच्या वतीने केले अन्नदान.
इंदापूर प्रतिनिधी: निमसाखर एज्युकेशन सोसायटीचे, एन. ई.एस. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय निमसाखर ता. इंदापूर जि. पुणे येथे संस्थेच्या व विद्यालयाच्या वतीने परमपूज्य सद्गुरु आनंदाश्रम स्वामी पायी पालखी सोहळ्याचे आनंदात स्वागत (दि.२२) करण्यात आले. त्यावेळी संस्थेचे  सचिव धनंजय सूर्यकांत रणवरे, उपाध्यक्ष संजय सूर्यकांत रणवरे उर्फ पप्पू पाटील तसेच यशवंत विविध कार्यकारी विकास सोसायटीचे विद्यमान चेअरमन नंदकुमार सूर्यकांत रणवरे, प्राचार्य चंद्रकांत गोपाळराव रणवरे, पर्यवेक्षक मधुकर शंकरराव खरात कनिष्ठ महाविद्यालयाचे विभाग प्रमुख चंद्रकांत बलभीम बोंद्रे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सर्व विद्यार्थ्यांनी परमपूज्य सद्गुरु आनंद आश्रम स्वामींच्या पालखीचे मनोभावे दर्शन घेतले. संस्थेच्या विद्यालयाच्या वतीने सर्व वारकरी बंधू-भगिनींसाठी दुपारची भोजन व्यवस्था करण्यात आली.
close