*बांडेवाडी शाळेत मुलांनी अनुभवला पालखी सोहळा..*
*चिमुकल्या विठ्ठल रुक्मिणीचे जागोजागी मनोभावे पुजन..*
*पालक , ग्रामस्थ यांचेकडून मुलांना केळी , बिस्कीट , चॉकलेट , पोहे , जिलेबी भरपूर खाऊ वाटप..*
इंदापूर प्रतिनिधी: दि 24 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बांडेवाडी व अंगणवाडी यांचे संयुक्तपणे बांडेवाडी परिसरात पालखी , दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला. यामध्ये विठ्ठल रुक्मिणी , पताका , तुळस घेतलेल्या मुली , टाळ , कपाळी गंध , ग्यानबा तुकाराम जयघोष करत सुंदर साड्या घालून मुली सहभागी झाल्या. मुलांनी कुर्ता पायजमा टोपी पेहराव केला होता. जेष्ठ नागरिक पालखी कौतुक केले.
जागोजागी महिलांनी चिमुकल्या विठ्ठल रुक्मिणी पुजन केले. रेणुकामाता मंदिर , यमाई तुकाई मंदीर , गणपती मंदिर याठिकाणी दिंडीचे स्वागत केले. सचिन बांडे , सुभाष जावळे , अनिता बांडे , सतिष बांडे , भाऊसाहेब कदम , रविंद्र बांडे , सुरज गाडेकर , संदिपान बांडे यांनी अल्पोपहार , खाऊ वाटप केले. पालखी सोहळ्यात पालक व महिला सहभागी झाल्या. नियोजन मुख्याध्यापक संतोष हेगडे , शिक्षिका ललिता वाघमोडे , अंगणवाडी सेविका सुनंदा पोंदकुले , मदतनीस उर्मिला बांडे यांनी केले.

