shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नागरीक राष्ट्राला सावरतो तोच खरा स्वातंत्र्यवीर सावरकर - पार्थ बावस्कर

*अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ शाखा गंगाखेड चे आयोजन

*तिनही कार्यक्रमास ब्रह्मवृंदांसह हिंदू प्रेमींचा उदंड प्रतिसाद

*भारतमातेला स्वातंत्र मिळवून देण्यासाठी जिवनाचा त्याग केला - ब्राह्मनाथकर

शौकतभाई शेख
गंगाखेड - सर्व शाखीय ब्राह्मण समाज प्रतिष्ठान, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ शाखा गंगाखेड आयोजीत स्वातंत्रविर सावरकर सप्ताहात गंगाखेड शहरवासियांना तिन कार्यक्रमाची परवनी देवुन शहरवासियांनी कार्यक्रम यशस्वी केला. तिनही कार्यक्रमात संत महंतांसह विविध मान्यवरांनी उपस्थिती लावुन अनेकांचा गौरव कारण्यात आला. प्रख्यात व्याख्यातांनी थरारक असे व्याख्यान सांगुन प्रेक्षकांना मंत्रमुद्ध केले. यावेळी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ शाखा गंगाखेड च्या ५१ पदाधिकाऱ्यांची संघटना वाढीसाठी व ब्राह्मण समाजाच्या सर्वांगीन कार्यासाठी विस्तारीकरण करून त्यांचाही याच कार्यक्रमात पदग्रहण सोहळा घेण्यात आला.


सर्व शाखीय ब्राह्मण समाज प्रतिष्ठाण संचलित अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ शाखा गंगाखेड च्या वतिने स्वातंत्रविर विनायक दामोदर सावरकर यांच्या सप्ताह निमीत्य तिन भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, या तिनही कार्यक्रमास शहर व परीसरातील ब्रह्मवृंद, संत महंत, हिंदुप्रेमींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावुन गंगाखेड च्या श्री संत जनाबाई नगरीत एक आगळा वेगळा उपक्रम राबवुन देश स्वातंत्रासाठी ज्यांनी स्वताहाच्या प्राणाची आहुती दिली. आशा स्वातंत्रविरावर थरारक अशे व्याख्यान झाले.
       या वेळी व्यासपिठावर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते पार्थ बावस्कर मुंबई, कार्यक्रमाचे अध्यक्ष यज्ञ महर्षी वे.शा.स.प.पू. यज्ञेश्वर महाराज सेलुकर वे.शा.स रामचेद्र महाराज टाकाळकर, ह. भ. प. माणिक महाराज शास्त्री, वे.शा.स. आशोकराव पाठक, अखिल भारतीय ब्राह्मण महासं घाचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष निखीलभाऊ लातुरकर, महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता संजय कुलकर्णी (सुपेकर) मराठवाडा संपर्क प्रमुख प्रविन मुदगलकर, नांदेड जिल्हा प्रमुख विजय जोशी, परभणी जिल्हा प्रमुख शंकरराव आजेगाव कर सामाजिक पदाधिकारी विजयराव पिंगळे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
     या पहिल्या कार्यक्रमात महाराष्ट्रातील सुप्रसि द्ध साहित्य नाट्य चित्रपट क्षेत्रातील लेखक सावरकर आभ्यासक युवा इतिहासकार पार्थ बावस्कर मुंबई यांनी स्वातंत्रविर सावरकरांकडुन आम्ही काय शिकावे? या विषयावर तब्बल दिड ते दोन तास शहरातील राजेश्वर फंक्शन हॉल येथे २६ मे रोजी स्वातंत्रविर विनायक दामोदर सावरकर यांच्या जिवनावरचे थरारक अशे व्याख्यान देवुन प्रत्येकांच्या घरात स्वातंत्रविरांचे फोटो लावायलाच पाहिजे त्यामुळे लहान मुलांवर संस्कार घडतात पुढच्या पिढीला जो पर्यंत क्रांतीकार कळणार नाही तोपर्यंत त्यांना देश कोणी स्वातंत्र करून दिला ते काय कळनार. वि. दा. सावरकरांनी त्यावेळी असंख्य मराठी शब्दांचा कोश निर्मान केला होता त्याच सर्व मराठी शब्दांची आता कुठ शासनाकडुन अंमल बजावनी करण्यात येत आहे. आपन आपल्या मुलांवर संस्कार करायला कमी पडतो त्यामुळेच अनर्थ घडत असतात.
प्रत्येक पालकांनी सावरकरांच विचा वाचुन आपल्या पाल्यांना सांगीतले तर निश्चित चमत्कार घडल्याशिवाय राहणार नाही.

    
यावेळी या कार्यक्रमाचे आयोजक अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता यांनी गंगाखेड शहरात २१ वर्षाच्या कार्यकाळात असंख्य सामाजिक धार्मिक सांस्कृतीक उपक्रम घेवुन शासन दरबारीही कसा संघर्ष करावा लागला याचा परखड शब्दात श्रोत्यांसमोर एक प्रकारे सविस्तर आवाहालच सादर केला. यापुढेही समाज उपयोगी मोठ मोठया कार्यक्रमांसह विविध उपक्रम राबविण्याचेही यावेळी राबविण्यासठी देखील त्यांनी यावेळी संकल्प केला त्यासाठी समाजाकडुन कृपारूपी अशिर्वाद व एकजुटीसाठी साथ हवी असल्याचेही सुपेकर यांनी यावेळी आपल्या प्रास्ताविकातुन स्पष्ट केले. अध्यक्षकिय समारो पात यज्ञमहर्षी प. पू. यज्ञेश्वर महाराज सेलुकर योनी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ शाखा गंगाखेड चे काम गेल्या अनेक वर्षापासुन यशस्वी रीत्या सुरू असुन त्यांच्या विविध उपक्रमातुन समाजाला एकत्री येण्याची वेळोवेळी संधी मिळत असते. अशी समाजाची सार्वजनिक कामे करणाऱ्यांच्या पाठीशी खंबिरतेन उभे राहिले पाहीजे असे मार्मिक शब्दात बोलुन सर्व श्रोत्यांना व्यासपिठावरून शुभअर्शिवाद दिले.
      
दुसऱ्या कार्यक्रमात रविवार २८ मे रोजी सकाळी ९ वाजता भगवती मातेची महाआरती करून संपुर्ण गंगाखेड शहरवासी यांना स्वातंत्र्यविर वि. दा. सावरकर यांच्या जयंती निमीत्य दिवसभर अभिवादन करण्यासाठी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ शाखा गंगाखेड ने भव्य असा सेल्फी पॉईंट केला होता तर तिसऱ्या कार्यक्रमात सायंकाळी ४ वाजता स्वातंत्रविर वि.दा. सावरकर बहुदेशिय सेवाभावी संस्था व अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ यांच्या सयुक्त विद्यमानाने महाराष्ट्रीतील सुप्रसिद्ध व्याख्याते भास्करराव ब्रह्मनाथकर यांनी स्वातंत्रविर सावरकर एक धगधगते यज्ञकुंड या विषयावर अत्यंत परखड पणे थरारक असे व्याख्यान देवुन प्रेक्षकांना मंत्रमुद्ध केले.

        
या कार्यक्रमात सेवानिवृत्त मुख्याध्यापक रंगराव सुपेकर, अॅड. स्मिताताई देशमुख यांनी सुत्रसंचालन केले. तर तिनीही कार्य क्रमाचे आभार राष्ट्रगीताने करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुकाध्यक्ष चंद्रकांत खारकर, शहराध्यक्ष डॉ. समिर गळाकाटु, उपाध्यक्ष अॅड. महेश साळापुरीकर, महासचिव देवानंद जोशी, प्रसिद्धी प्रमुख नागेश केरकर, ग्रुप प्रमुख राम कासांडे, नियोजन प्रमुख राम कुलकर्णी, यांच्यासह अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत केली.


*समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर

close