शिर्डी प्रतिनिधी :- ५३ वर्षानंतर तीन पिढ्यापासून स्वप्न पाहत असलेल्या भिवंडी कालव्याची पाणी ३१ मे रोजी शेतकऱ्यांच्या शेतात येणार असल्याने मनाला मोठे समाधान असून रखडलेल्या निळवडे प्रकल्पाचे काम राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून केलेल्या प्रयत्नाला आलेले यश ही समाधानाची बाब असल्याची मत शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी शिर्डी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली.
३१ मे रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माजी मंत्री मधुकर पिचड खासदार सदाशिवराव लोखंडे खासदार डॉक्टर सुजय विखे आदिंसह विविध मान्यवर यांच्या उपस्थितीत निळवंडे धरणातून पाणी सोडण्यात येणार आहे त्या बद्दल यावेळी माहिती देण्यात आली यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख कमलाकर कोते, विजय काळे निळवंडे कृती समितीचे अध्यक्ष नानासाहेब शेळके कार्याध्यक्ष उत्तमराव घोरपडे आधी सह विविध पदाधिकारी उपस्थित होते
खासदार सदाशिव लोखंडे म्हणाले की ५३ वर्षापासून प्रलंबित असलेल्या निळवंडे धरणाचे काम व्हावे यासाठी आपण सर्वांना बरोबर घेऊन केंद्र आणि राज्य सरकारकडे मोठा पाठपुरावा केला आहे यासाठी आपण थेट लोकसभेत प्रश्न देखील उपस्थित करू रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी सुमित्रा महाजन यांच्यासह माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आधी संविधान कडे मोठा पाठपुरावा केला होता या केलेल्या पाठपुरावामुळेच जेल आयोगाची मान्यता मिळाल्यानंतर २०२३ते२४ च्या अर्थसंकल्पात कालव्याच्या कामासाठी ५१७७ कोटी रुपयांची तरतूद देखील झाली होती यासाठी आपण साई जलदिंडी भव्य मोटरसायकल रॅली आजार उपोषण मुख्यमंत्री व सर्व मंत्र्यांना निळवंडे धरणाच्या पाण्याचा कलश साई प्रतिमा भेट देऊन मोठा पाठपुरावा केला होता त्यामुळे हे यश मिळाले आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघात खासदारकीला उभे राहिल्यानंतर जनतेने न पाहता मला दोन लाख मतांनी निवडून दिले होते त्यामुळे निळवंडे धरणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण संकल्प केला होता व आता थेट या धरणातून कालव्यात पाणी सोडण्याचा कार्यक्रम ३१ मे रोजी संपन्न होत आहे अशावेळी या आनंदाच्या क्षणी आपण सर्वजण साक्षीदार होण्याची भाग्य आपल्याला मिळाले आहे निळवंडे धरण प्रकल्प क्षेत्रातील १८२ गावांना न्याय देताना काहींची नाराजी देखील घेतली २००५ साली जो कायदा पास झाला त्याला त्यावेळी विरोध करण्यासाठी मोठी गरज होती गेल्या चार वर्षापासून मोठ्या प्रमाणावर पाऊस होत असल्यामुळे शेतकऱ्यांना जरी अडचण आली नसली तरी जर पाऊस कमी झाला असता तर निश्चितपणे शेतकऱ्यांना त्रास झाला असता आता या निळवंडेचे पाणी या कालव्याच्या माध्यमातून थेट शेवटच्या केलं पर्यंत येणार असल्यामुळे हा आनंदाचा क्षण आहे कालव्याच्या नंतर चारीचा प्रश्न देखील निकाली काढण्यात येणार आहे या पुढील काळात घाटमाथ्याच्या पाण्यासाठी आपण गती देणार असून त्यासाठी देखील आपण केंद्र आणि राज्य सरकारकडे सर्वांना बरोबर घेऊन पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केली निवडणूक धरणाचे काम पूर्णतः जाण्यासाठी अनेकांनी योगदान दिले आहे ते नाकारता येणार नाही हे काम पूर्ण होत आहे व जलद गतीने मार्गी लागत आहे यातच आपल्याला मोठे समाधान असल्याचे सांगून धरणाच्या कामासाठी आजाद मैदानावर उपोषण बसणारा मी पहिला खासदार असल्याचे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले जनतेने जो विश्वास दाखवलेला आहे. त्यामुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघातून दोन वेळेस संधी मिळाली आहे या पुढील काळात देखील आपण जनता व जनार्दनाच्या पाठबळावर जनता आपल्याला संधी देईल असा विश्वास व्यक्त केला ५३वर्षे प्रलंबित असलेले धरणाचे रखडलेले काम आपण मार्गी लावू शकलो यातच आपल्याला समाधान असून श्रेय वादात पडण्यापेक्षा आपण काम कसे मार्गी लागेल यासाठी प्रयत्न करत राहिलो अशी कबुली त्यांनी दिली सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन निळवंडेचे पाणी कलश घेऊन साईबाबा सह १८२गावातील शंकराच्या मंदिरात जाऊन सर्वपक्षीय कार्यकर्ते अभिषेक करणार असल्याचे सांगितले यावेळी विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले याप्रसंगी विठ्ठल घोरपडे राजेंद्र सोनवणे दत्ता भालेराव शिवाजी शेळके सर्जेराव घोरपडे प्रभाकर गायकवाड अन्नासाहेब वाघे बाळासाहेब रहाणे सौरभ शेळके विलास गुळवे सुखंलाल गांगवे निलेश शेळके आदीसह विविध मान्यवर उपस्थित होते यावेळी निळवंडे कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी सांगितले की येत्या लोकसभेच्या निवडणुकीत देखील खासदार सदाशिव लोखंडे यांना विजयी करण्यासाठी आपण तन मनधाराने काम करणार असल्याची ग्वाही यावेळी दिली.

