shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जवळबन येथील माऊली विद्यालयाची यशाची परंपरा कायम..!!



प्रकाश मुंडे  / बीड जिल्हा प्रतिनिधी  :-
 केज तालुक्यातील जवळबन येथील श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था संचलित, माऊली विद्यालयाचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे. गुणवंत विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा कायम जपली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले जात आहे.

माऊली विद्यालयातून प्रथम  अस्मिता गायकवाड 89.80%, द्वितीय अस्मिता जोगदंड 87.40 %,तृतीय शैलेश करपे 87.00% तृतीय क्रमांक मिळवला तर  प्रथम श्रेणीमध्ये इतर विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.


विद्यार्थ्यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.संस्थेचे सचिव रमेशराव आडसकर यांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले. मुख्याध्यापक मधुकर नखाते,सहशिक्षक शंकर सोळंके ,  विज्ञान विभागाचे प्रमुख शिवाजी अप्पा हजारे ,राहुल देशमुख,शिक्षेकेत्तर कर्मचारी अरुण निकम, लिंबा पवार आदींच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
close