============================ प्रकाश मुंडे / बीड जिल्हा प्रतिनिधी :-
शारीरिक क्षमता टिकवून ठेवण्यात खेळ महत्वाची भूमिका बजावतात परिणामतः आयुष्यात खेळांची महत्वपूर्ण भूमिका आहे त्यामुळे भविष्यात येडेश्वरीच्या माध्यमातून आपण खेळाडूंच्या पाठीशी उभे राहू अशी ग्वाही येडेश्वरीचे चेअरमन बजरंग सोनवणे यांनी दिली. विजय स्पोर्ट्स अकॅडमी च्या वतीने केज येथे जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असता उदघाटक म्हणून ते बोलत होते .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जि प सदस्य सुरेश पाटील होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार पृथ्वीराज साठे , सामाजिक कार्यकर्ते हनुमंत भोसले , सर्वद्न्य अकॅडमीचे बांगर , पत्रकार रामदास तपसे , पत्रकार सुहास चिद्रवार , पत्रकार अजय भांगे , पी एस आय शेख , नगरसेवक भाऊसाहेब गुंड , मगर सर यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना सोनवणे म्हणाले कि आयुष्यात शिक्षणाला महत्व आहे पण खेळाकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही नौकरी मिळवतानाही खेळातील अतिरिक्त गुणांना देखील महत्व आहे तसेच भविष्यात विजय स्पोर्ट्स अकॅडमी च्या माध्यमातून आपण खेळाडूंच्या पाठीशी उभे राहू असे सांगत त्यांनी केज शहराच्या विकासासाठी कटीबद्ध असल्याचा पुनरुच्चार देखील केला .
यावेळी बोलताना पृथ्वीराज साठे यांनी या स्पोर्ट्स अकँडमी च्या माध्यमातून शहरास वेगळी ओळख मिळावी असा आशावाद व्यक्त करत मुलांना खेळाकडे नेण्याच्या प्रयत्नाचे कौतुक केले. यावेळी सुरेश पाटील व हनुमंत भोसले यांची समयोचित भाषणे झाली. तसेच यावेळी गृहखात्यात निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा देखील मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय स्पोर्ट्स अकँडमीचे संचालक विनोद गुंड यांनी केले. तर आभार तथा सुत्रसंचलन गिरी यांनी केले तर बाहेती सर , जिशान सर, सौ जयश्री गुंड, नेहरकर सर यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

