shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

*माऊली वृद्धाश्रमासाठी दीपक अण्णा पटारे यांचे योगदान प्रेरणादायी =सुभाष वाघुंडे*


शिरसगाव प्रतिनिधी:
गोरगरिबांची सेवा करणे हा आदर्श आपण जपत आहोत, सप्टेंबर २०१७ पासून सुरु झालेल्या माऊली वृद्धाश्रमाला अनेकांचे हातभार लागलेले आहेत, भाजप तालुका अध्यक्ष दीपक अण्णा पटारे यांनी वाढदिवसाच्यानिमित्ताने आम्हाला मदत केली, त्यांचे योगदान हॆ प्रेरणादायी असल्याचे मत माऊली वृद्धाश्रमाचे संस्थापक, अध्यक्ष सुभाष वाघुंडे यांनी व्यक्त केले. 

येथील माऊली वृद्धाश्रमात श्रीरामपूर पंचायत समितीचे माजी अध्यक्ष व भाजप तालुका अध्यक्ष दीपक अण्णा पटारे यांच्या वाढदिवसाच्यानिमित्ताने सुभाष वाघुंडे, सौ. कल्पनाताई वाघुंडे यांनी औक्षण करून पुष्पहार, बुके, श्रीफळ, पुस्तके देऊन सत्कार केला, त्यावेळी दीपक पटारे यांनी सुभाष वाघुंडे यांच्या वृद्धाश्रम आणि निराधार विद्यार्थी आश्रमास भरीव आर्थिक मदत केली, त्यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना सुभाष वाघुंडे बोलत होते. साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी दीपक पटारे व सहकारी यांना विविध पुस्तके देऊन सन्मान केला. कवी, पत्रकार राजेंद्र देसाई यांनी दीपक पटारे यांचे कौतुक केले.दीपक पटारे यांनी माऊली वृद्धाश्रमात चाललेल्या उपक्रमास सदैव मदत करू असे सांगून सत्काराबद्दल आभार मानले.कारेगाव पतसंस्था चेअरमन निलेश तऱ्हाळ, व्हाईस चेअरमन अशोक जोशी यांनी दीपक पटारे यांना शुभेच्छा व्यक्त करीत वाघुंडे परिवाराचे कौतुक केले. यावेळी गणेश रोकडे, अनिल बागुल यांचा सत्कार करण्यात आला. नरेंद्र पटारे,अंकुश पटारे, रामभाऊ जगताप, बाबा साळवे, सुभाष पटारे यांच्यासह वृद्धाश्रमातील वृद्ध स्त्री पुरुष उपस्थित होते. शुभम नामेकर, दत्तात्रय खिलारी,ह.भ. प.भाऊसाहेब राऊत आदिंनी नियोजन केले.प्रा. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी मनोगत व्यक्त करून आभार मानले.

वृत्तसंकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

close