श्रीरामपूर प्रतिनिधी:
"आजी ही मायभूमीशी खूप प्रेम करते !, घार फिरते आकाशी तरी लक्ष तिचे पिलापाशी तसं मायमाती हीच जीवाला खरा विसावा देते. गावमाती म्हणजे आईचं ह्रदय असतं, तिथं खरा अमृतस्पर्श मिळतो" !
स्व.सावित्रीबाई दादा पवार (वय-१०५) यांचे एकादशी दिवशी वार बुधवार १४ जून २०२३ वेळ सकाळी पहाटे ४ वाजता नुकतेच निधन झाले असून या वृत्ताने श्रीरामपूर पंचक्रोषीत सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांचा दशक्रिया विधी २३ जून २०२३ रोजी सकाळी ९ वाजता वाघेश्वर मंदिर परिसर,वाघोली पुणे याठिकाणी होणार आहे.
आई म्हणजे आत्म्याचा ईश्वर होय.साने गुरुजी यांनी लिहिलेल्या 'श्यामची आई 'चे मनावर संस्कार आहेत,याचा अनुभव माझ्या आजीच्या बाबतीत आहे.१०५ वर्ष निरोगी आणी समाधानी जीवन जगलेली माझी आजी स्व.सावित्रीबाई दादा पवार यांचे आदर्श संस्कार आणि समाजसेवेची दिलेली शिदोरी मला अमृतासमान आहे,तसेच कठीण काळात आमच्या कुटुंबाचा प्रामाणिकपणे आजीने केलेला सांभाळ हा सदैव अविस्मरणीय आहे.असे भावपूर्ण उदगार भूमी फाऊंडेशनचे संस्थापक,अध्यक्ष कैलास पवार यांनी काढले.
महांकाळ वाडगाव येथील स्व. सावित्राबाई दादा पवार यांचे १०५ वर्षाचे जीवन म्हणजे कृषीसेवेचा आणि गावसेवेचा आठवणींचा ठेवा आहे.श्रीरामपूर येथील वाचन संस्कृती प्रतिष्ठान, विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठान,ॲड.रावसाहेब शिंदे प्रतिष्ठान,महाराष्ट्र साहित्य परिषद, श्रीरामपूर शाखा,भूमी फाऊंडेशन पदाधिकारी,कार्यकर्ते यांच्या वतीने स्व.सावित्राबाई दादा पवार श्रद्धांजली वाहण्यात आली, त्याप्रसंगी कैलास पवार यांनी 'माझी आजी एक संस्कारतीर्थ 'या विषयावर असंख्य आठवणींना उजाळा देत आज माणसाला खूप आयुष्य मिळणं हे महत्त्वाचं नसून ते आयुष्य कसं मिळालं याला फार महत्त्व आहे. त्यामुळे आयुष्यात समाधान शोधणे फार महत्त्वाचे आहे.यावेळी प्रभात दुध डेअरीचे संस्थापक किशोर अण्णा निर्मळ, प्राचार्य टी.ई.शेळके,मुंबई पोलीस अधिकारी अशोक त्रिभुवन, प्रा.डॉ.बी.एस.मुरादे ,प्राचार्य शंकरराव अनारसे, प्राचार्य डॉ. शंकरराव गागरे,बालरोग तज्ञ डॉ. प्रकाश मेहकरकर,सुखदेव सुकळे,साहित्यिक डॉ.बाबुराव उपाध्ये,पत्रकार प्रकाश कुलथे, संपादक करण नवले,कवयित्री संगीता फासाटे,प्रा.शिवाजीराव बारगळ,पत्रकार बाबासाहेब चेडे, आरोग्यमित्र भीमराज बागुल, विलास पवार तसेच ईतर प्रशासकीय अधिकारी वर्ग आदिंनी स्व.सावित्रीबाई पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली.
वृत्तसंकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

