कलावंतांनी उपस्थित रहावे संघटनेचे आवाहन
वजीर शेख - पाथर्डी
संपूर्ण राज्यात तळागाळातील - उपेक्षित,दुर्लक्षित, वंचित, नवोदित जे जे कवी,गायक, साहित्यिक,अभिनेते,नाटक, चित्रपट, मालीका (सिरियल) निर्मिते- दिग्दर्शक,वाघे-मुरळी, गोंधळी,भजनी मंडळ, किर्तनकार,तमाशा कलावंत, वासुदेव,नंदीबैलवाले,बहुरूपी, वारकरी, आदिवासी नृत्य, संबळ वादक, सनई वादक,ब्रास बँन्ड वादक,शास्त्रीय- सुगम संगित, संगित विशारद,कराओके कलावंत,लावणी डान्सर, ऑर्केस्ट्रा कलावंत असे विविध क्षेत्रातील सर्व प्रकारचे वाद्य वाजविणारे कलावंत,चित्रकार अशा सर्व स्तरातील कलावंतांना महाराष्ट्र राज्य सरकार व केंद्र सरकारच्या वतीने देण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी राज्यव्यापी कलावंतांची एकमेव पोलादी संघटना "महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समिती" या राज्यव्यापी कलावंत संघटनेच्या वतीने नाशिक जिल्ह्यातील कलावंतांची दिशादर्शक बैठक रविवार दि.१८ जुन २०२३ रोजी दुपारी १२ वाजता चांदवड शहरातील सुमन लॉन्स, मनमाड- चांदवड रोड लगत याठिकाणी आयोजित करण्यात आली असल्याची माहिती संघटनेचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बाळासाहेब अस्वले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
आज महाराष्ट्रातील ९५% ज्येष्ठ कलावंत हे फक्त राज्य सरकारचेच मानधन घेत आहेत, केंद्र सरकारने देऊ केलेल्या मानधनापासुन हजारो कलावंत आज वंचित आहेत.म्हणून नाशिक जिल्ह्यातील कलावंतांना केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ मिळावा यासाठी महाराष्ट्रात ज्येष्ठ कलावंतांचे एकीकरण करण्यासाठी महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समिती ने पुढाकार घेतला आहे. म्हणून चांदवड येथील दिशादर्शक बैठक संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुप्रसिद्ध गायक सोमनाथ गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली तर प्रदेश उपाध्यक्ष सिनेअभिनेते रमेश जाधव, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष निर्माता हिरामण मनोहर, जिल्हाध्यक्ष धोंडीराम थैल, जिल्हा कार्याध्यक्ष सरपंच दत्तात्रय तांबे, प्रदेश सचिव चत्रु आव्हाड आदींच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
तरी नाशिक जिल्ह्यातील कलावंतांनी जास्तीत जास्त संख्येने कलावंत दिशादर्शक बैठकीस उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा उपाध्यक्ष अंबादास वानखेडे, चांदवड तालुका अध्यक्ष गायिका परविन भाभी बागवान तसेच वजीर शेख आदिंनी केले आहे.
वत्तसंकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

