तेजपृथ्वी ग्रुपच्या संस्थापक अध्यक्षा अनिताताई खरात यांचा अभिष्टचिंतन दिन होणार सामाजिक उपक्रमाने साजरा.
इंदापूर प्रतिनिधी: नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे व्यक्तिमत्व तेजपृथ्वी ग्रुपच्या माध्यमातून नेहमी वंचित घटकांना, शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी, युवक यांचे प्रश्न सोडवण्यासाठी तसेच महिला दक्षता समितीच्या माध्यमातून महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी मदत करणे तसेच राष्ट्रीय संसद सरपंच संघटनेच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नासाठी सतत झटत राहणे या वअशा अनेक प्रश्नावर नेहमी कार्यरत असणारे व्यक्तिमत्व म्हणजेच अनिताताई खरात आणि त्यांच्या अभिष्टचिंतन दिन वेगवेगळ्या गावातील ग्रामस्थांनी व युवा कार्यकर्त्यांनी अनिताताईच्या अभिष्टचिंतन दिनाच्या निमित्ताने त्याच्यां कामाला साजेल असेल सामाजिक उपक्रम घेण्याचे ठरवले आहे, यामध्ये खोरोची,रेडणी, हिंगणगाव, इंदापूर, टेंभुर्णी, वडापुरी अशा वेगवेगळ्या ठिकाणी तेथील स्थानिक ग्रामस्थांनी व युवकांनी अनिताताईचयां अभिष्टचिंतन दिनानिमित्त वृक्षारोपण, शालेय साहित्य वाटप, फळे वाटप, लहान मुलांना खाऊ वाटप ,वृद्ध मातापित्यांना जेवण असे कार्यक्रम आयोजित केले आहेत.

