shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आठवड्याभरात शिक्षक न दिल्यास पंचायत समिती समोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा.

पडस्थळ येथील जिल्हा परिषद शाळेतील पालकांचा आठवड्याभरात शिक्षक न दिल्यास पंचायत समिती समोर  धरणे आंदोलन करण्याचा इशारा.

शिक्षकांच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम.

पडस्थळ ग्रामस्थांतर्फे जि. प. प्राथमिक शाळेसाठी शिक्षकाची निवेदन द्वारे मागणी.
इंदापूर प्रतिनिधी: शाळा चालू होऊन दोन आठवडे झाले तरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील गरिबांची मुले शिकत असणाऱ्या या शाळेला पटसंख्येनुसार आजही शिक्षक उपलब्ध न झाल्याने विद्यार्थ्यांचे होणाऱ्या नुकसानीचा विचार करून सदर शाळेतील शिक्षण समितीच्या  व पालकांच्या वतीने शिक्षक मागणी होत असून विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षक देण्याचे काम शासन आणि प्रशासन करेल का?  याकडे पहाणे अवचित्याचे ठरेल. असेच नुकसान होणाऱ्या एका गावातील पालकांनी
सोमवार दि. २६ जून २०२३ रोजी पडस्थळ ग्रामस्थांतर्फे इंदापूर पंचायत समितीच्या गटशिक्षण विभागाकडे दोन शिक्षकांची मागणी केली आहे. तशा आशयाचे मागणी पत्र ग्रामस्थांनी गटशिक्षणाधिकारी अजिंक खरात यांच्याकडे सुपूर्द केले. या निवेदनात म्हटले आहे की पडस्थळ जि. प.प्राथमिक शाळेचा विद्यार्थी पट हा ११५ झालेला आहे.गेल्या वर्षीपासून तेथे ४ शिक्षकांची गरज असताना दोनच शिक्षक शिकवण्याचे काम करत आहेत, त्यामुळे शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होऊन विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.यासाठी नियमानुसार आणखीन दोन शिक्षकांची गरज असल्यामुळे त्वरित दोन शिक्षक मिळावेत अशी मागणी करण्यात आली. शाळेने आतापर्यंत मंथन परीक्षा, अभिरूप स्पर्धा परीक्षा,जवाहर नवोदय विद्यालय परीक्षा अशा विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केलेली आहे. परंतु शिक्षकांच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत आहे. यावेळी महेंद्र रेडके, भारत बोंगाणे, सचिन मारकड, नानासाहेब बोंगाणे, वैभव सरडे उपस्थित होते. जर आठवड्याभरात शिक्षक न दिल्यास पंचायत समिती समोर  धरणे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. यावर गटशिक्षणाधिकारी अजिंक्य खरात यांनी योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
close