shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पाऊस लांबल्याने शेतीसाठी त्वरित आवर्तन घ्यावेःमाजी आ.भानुदास मुरकुटे


श्रीरामपूर प्रतिनिधी:
पाऊस लांबला असून शेतातील उभी पिके पाण्याअभावी करपू लागली आहेत. सध्या भंडारदरा व निळवंडे धरण मिळून आठ टि.एम.सी.पाणी उपलब्ध आहे. तरी शेतीसाठी त्वरीत आवर्तन सोडावे आणि लाभक्षेञातील शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी माजी आ.भानुदास मुरकुटे यांनी केली आहे.


श्री.मुरकुटे म्हणाले की, निम्मा जून महिना उलटून गेला तरी लाभक्षेञात पाऊस नाही. मान्सूनपूर्व (वळीव) पावसानेही पाठ फिरवली. यामुळे पाण्याची पातळी खालावली असून पाणीटंचाईसदृश स्थिती निर्माण झाली आहे. 

           पावसाने ओढ दिल्याने शेतातील उभी ऊसासह अन्य पिके करपू लागली आहेत. यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत आहे. हे ध्यानात घेता भंडारदरा व निळवंडे धरणात समाधानकारक पाणी साठा आहे. त्यामुळे तातडीने शेतीसाठी आवर्तन घ्यावे आणि पिकांना जिवदान देवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी माजी आ.भानुदास मुरकुटे यांनी पाटबंधारे विभागाकडे केली आहे.

वृत्तसंकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

close