सोहम एंटरप्राइजेसचे चि. सोहम ज्ञानदेव शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन .
बोरी गावच्या सुपुत्राने पुणे येथे जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर थाटला व्यवसाय.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यातील बोरी गावचे सुपुत्र ज्ञानदेव शिंदे यांनी पुणे येथील चाकण खेड या ठिकाणी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर व्यावसायिक क्षेत्रामध्ये सर्वांना बरोबर घेऊन भरारी घेत त्यांनी स्वतःची सोहम एंटरप्राइजेस नावाची फर्म उभी केली असून या माध्यमातून ते ट्रान्सपोर्ट सर्व्हिस, कॉन्ट्रॅक्ट आणि डेव्हलपर्स अशा पद्धतीच्या लोकोपयोगी सेवा देण्यासाठी उभा केलेल्या या व्यवसायाचे उद्घाटन त्यांच्या लहान मुलांच्या चिरंजीव सोहम ज्ञानदेव शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी या कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते सोपान मोरे, राष्ट्रपती पुरस्कार विजेते मनोज गुंजाळ,आम आदमी पक्ष पिंपरी चिंचवड शहर जिल्हा अध्यक्ष वाजिद शेख, रयत कामगार संघटना खेड तालुका अध्यक्ष स्वप्नील मेदनकर , रॉयल ग्रुप टेक कंपनी चे मालक रामदास शिंदे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओबीसी सेल पुणे जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानदेव शिंदे ,मनसे चे युवा नेते गणेश लोणारी , तरुण कुमार, बाळासाहेब भुतकर, विलास जाधव, स्कायलाईन कंपनी चे मालक बालाजी वाहील, मंगेश मेदनकर, प्रवीण डोंगरे, पवन मिश्रा, हनुमंत सस्ते पाटील, ज्ञानेश्वर ताटे , आणि पाहुणे मंडळी आणि मित्र परिवार उपस्थित होते.

