shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पर्यावरण दिनानिमित्त मानकरवाडीत वृक्षारोपण

पर्यावरण दिनानिमित्त मानकरवाडीत वृक्षारोपण.
इंदापूर प्रतिनिधी:  श्री छत्रपती हायस्कूल मानकरवाडी येथे सह्याद्री वनराईमध्ये सह्याद्री वेडे सामाजिक संस्थेने वेगवेगळ्या देशी वृक्षांचे वृक्षारोपण केले. ही संस्था गेली चार वर्ष हा उपक्रम राबवत आहे. त्याचबरोबर सह्याद्री ग्रंथालयाच्या माध्यमातून विविध स्पर्धा घेणे तसेच वाचन संस्कृती वाढीस लागावी म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी ग्रंथालयाची निर्मिती केली.
 पर्यावरण दिनाचे औचित्य साधून श्री छत्रपती हायस्कूल मानकरवाडीचे उपमुख्यद्यापक  भागवत घुले सर यांना मुख्याध्यापक पदी प्रमोशन मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
 तसेच मानकरवाडी गावचे सुपुत्र आणि श्री छत्रपती हायस्कूल मानकरवाडीचे माजी विद्यार्थी चि.स्वप्निल दीपक मोरे यांची भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स अंतर्गत मिलिटरी इंजिनिअर सर्विसेस मध्ये ज्युनियर इंजिनिअर पदी निवड झाल्याबद्दल (ऑल इंडिया रँक ३१५) सत्कार करण्यात आला.
  मुख्याध्यापक  भागवत घुले सर यांनी विद्यार्थ्यांनी शाळेप्रती असणारी बांधिलकी न विसरता गुरु आणि आई वडील यांचे विस्मरण होऊन न देता सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवावी,तसेच देशाची व समाजाची सेवा करावी. असे आपल्या मनोगतात व्यक्त केले.
  याप्रसंगी सुनील घाडगे सर, सुनील कणसे सर, दिनेश यादव साहेब, मयूर काळभोर, सुमंत काळभोर, तेजस कणसे, चंद्रकांत मोरे, विशाल कणसे, रोहित मोरे, वैभव मोरे, रोहन कणसे, रितेश कणसे, सुमित कणसे इत्यादी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक अमोल कणसे यांनी केले तर आभार शिवाजी मोरे सर यांनी मानले.
close