इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान माध्यमिक विद्यालय तावशीचा सलग नऊ वर्ष दहावीचा निकाल १०० टक्के.
इंदापूर प्रतिनिधी: दिनांक २ जून २०२३ रोजी सन २०२३ इयत्ता दहावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान माध्यमिक विद्यालय तावशीचा सलग नऊ वर्ष दहावीचा १०० टक्के निकाल लागला आहे.
माध्यमिक विद्यालय तावशी
ता. इंदापूर जि. पुणे, इयत्ता दहावीचा निकाल १०० टक्के लागला असून साक्षी सुखदेव जाधव याने ८१.४० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला तर स्मित तात्यासो जाधव जाधव याने ७७ % गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळवला तर सिद्धी सुरेश माने ७६.६० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला.
तसेच माध्यमिक विद्यालय म्हसोबाचीवाडी ९४.५९% लागला असून प्रथम क्रमांक पूजा बाळासो पवार ८६.६० %, द्वितीय क्रमांक अंजना भगवान थोरवे ८२.०० %, तृतीय क्रमांक चांदगुडे सानिका नितीन ८०.००% मिळवली आहेत. संस्थेचे सचिव वीरसिंह रणसिंग व सर्व पदाधिकाऱ्यांनी दहावीच्या बोर्ड परीक्षेत घवघवीत यश मिळवल्याबद्दल सर्व विद्यार्थी ,पालक व शिक्षक बंधू भगिनीचे हार्दिक अभिनंदन केले. तसेच सर्व शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी देखील यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले.

