*इंदापूरच्या फुले माध्यमिक आश्रमशाळेचा दहावीचा निकाल ७६.९२ टक्के.*
*इंदापूर* (दि.२) :- दहावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल दि.२ जून २०२३ रोजी दुपारी १ वाजता जाहीर झाला. त्यात मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट या शिक्षण संस्थेच्या अंकित असणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले माध्यमिक आश्रमशाळेचा निकाल ७६.९२ टक्के लागला.
यावेळी विद्यालयात प्रथम क्रमांक १) कु. माया सुभाष शेंडगे - ७२% .२) कु. निरांजली हनुमंत पाटोळे - ७०.२०%. ३) शुभम आगतराव गावडे - ६९.८०% या प्रमाणे शेकडा गुण प्राप्त करून यश संपादन केले.यावेळी परीक्षेला एकूण ४१ विद्यार्थी बसले होते. पैकी २ विद्यार्थी परीक्षेला गैरहजर राहिले,अशी महिती विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अनिता साळवे यांनी दिली.
यावेळी यशस्वी विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक यांचे संस्थेच्या अध्यक्षा शकुंतला मखरे यांनी अभिनंदन केले.

