shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

संवेद वायकर याचे एस एस सी परीक्षेत यश


 नगर : २ /  महाराष्ट्र बोर्ड एस एस सी परीक्षा २०२३ मध्ये ज्ञानसंपदा स्कूल अहमदनगर चा विद्यार्थी संवेद संजय वायकर हा ९३.८० % गुण मिळवून उत्तीर्ण झाला . सर्व स्तरातील मान्यवरांकडून संवेद वर कौतुकांचा वर्षाव होत आहे . अपार जिद्द व चिकाटी आपल्याला यश नक्कीच मिळवून देते याची चुणूक संवेद ने दाखवून दिली. संवेद हा दै .पराक्रमी तसेच शिर्डी एक्सप्रेस वृत्तपत्राचे पत्रकार संजय वायकर व पत्रकार आसावरी वायकर यांचा मुलगा आहे .

कोणत्याही शाळेतील विद्यार्थ्यांच्या यशामागे शिक्षकांचा वाटा फार मोलाचा असतो. माझे आई वडिल व विद्यालयाचे मुख्याध्यापक तसेच सर्व शिक्षकांनी केलेल्या मार्गदर्शनाचे हे यशस्वी फळ आहे असे संवेदने बोलताना सांगितले. 

या यशामधे मुख्याध्यापिका सौ. शिवांजली अकोलकर यांचे मार्गदर्शन लाभले तसेच योगेश नेरीकर, प्रसाद बर्वे, कैलास जाधव, पुजा भाटिया, उज्वला पंडित , सोमा दास , दिप्ती पालवे, निलीमा निचीत, अर्चना पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले .
close