लोकनेते शहाजीराव पाटील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय बोराटवाडी चा दहावीचा निकाल ९३.०५. टक्के
इंदापूर प्रतिनिधी (दि.२) :- दहावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल दि.२ जून २०२३ रोजी दुपारी १ वाजता जाहीर झाला. शिवाजी एज्युकेशन सोसायटी संचलित लोकनेते शहाजीराव पाटील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय बोराटवाडी इयत्ता दहावी निकाल ९३.०५ टक्के लागला.
यावेळी विद्यालयात प्रथम क्रमांक १) चव्हाण धनश्री पोपट 93.40% .२) फडतरे सिद्धेश्वरी नंदकुमार90.80%. ३) डोईफोडे कोमल देविदास 90.00% या प्रमाणे यांनी सेमी विभागात शेकडा गुण प्राप्त करून यश संपादन केले.तर
विद्यालयात प्रथम क्रमांक १) माने नवनाथ अण्णा93.40% .२) मोरे सई दत्तात्रेय 75.00%. ३) घोडके सुकिया संतोष 74.60% या प्रमाणे यांनी मराठी विभागात शेकडा गुण प्राप्त करून यश संपादन केले
यावेळी परीक्षेला एकूण 72 विद्यार्थी बसले होते. पैकी 67 उत्तीर्ण 5 अनुत्तीर्ण झाले, विशेष प्राविण्य २१ , प्रथम श्रेणी २९ विद्यार्थी, द्वितीय श्रेणी १४ विद्यार्थी,तृतीय श्रेणी 3 विद्यार्थी यांनी गुण संपादन करून यशस्वी झाले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील तसेच उपाध्यक्ष मनोज पाटील, निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक उदयसिंह पाटील, संस्थेचे सचिव किरण पाटील, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य भीमराव आवारे ,उपप्राचार्य पर्यवेक्षक, शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

