shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जय भवानीगड विकास प्रतिष्ठान मध्ये 'राष्ट्रीय वाचन दिन' उत्साहात साजरा.

जय भवानीगड विकास प्रतिष्ठान मध्ये 'राष्ट्रीय वाचन दिन' उत्साहात साजरा.
इंदापूर प्रतिनिधी: जय भवानी गड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल लाखेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १९ जून २०२३ रोजी राष्ट्रीय वाचन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
*'वाचाल तर वाचाल'* या उक्तीप्रमाणे मानवी जीवनातील वाचनाचे महत्त्व ,दररोज कमीत कमी दहा ओळी तरी वाचल्या पाहिजे, १९ जून हा राष्ट्रीय वाचन दिवस केरळ पुस्तक आंदोलनाचे जनक पी.एस.पानीकर यांच्या पुण्यतिथी निमित्त साजरा केला जातो, शरीराला जसा व्यायाम तसे मनाला वाचन हे उत्तम आहे असे विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
संस्थेचे प्राचार्य राजेंद्र सरगर सर यांनी सांगितले की,विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी वाचनावर भर द्यावा  तसेच अवांतर वाचन करावे, संपूर्ण मानवी जीवनात मानवाला साथ देण्याचे काम वाचनच करत असते, विद्यार्थ्यांनी आपल्या वाढदिवसाला किमान एक पुस्तक तरी आपल्या ग्रंथालयाला भेट द्यावे असे सांगितले.
 वाचन दिनानिमित्त विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था अतिशय सुरेख पद्धतीने केली होती.वाचन दिन या शब्दातील आकारात विद्यार्थी बसून शांततेत वाचन मग्न होते हे दृश्य अतिशय मनमोहक व आकर्षक दिसत होते.
वाचन दिनाचे औचित्य साधून संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष  श्रीमंत ढोले सर, उपाध्यक्षा सौ. चित्रलेखा ढोले मॅडम ,संस्थेचे सल्लागार   प्रदीप गुरव सर ,सचिव  हर्षवर्धन खाडे सर,सहसचिव सौ. पौर्णिमा हर्षवर्धन खाडे मॅडम यांनी सर्वांना राष्ट्रीय वाचन दिनाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या.
सर्व कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रशासक  गणेश पवार सर, प्राचार्य  राजेंद्र सरगर सर,सर्व विभागाचे सुपरवायझर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
close