जिद्द,चिकाटी अन् प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यास यश मिळणार- पोलीस उपनिरीक्षक रतीलाल चौधरी .
इंदापूर प्रतिनिधी: श्री.छत्रपती शिक्षण संस्थेचे , श्री छत्रपती कला व वाणिज्य महाविद्यालय भवानीनगर येथे राष्ट्रीय वाचन दिन हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात घेण्यात आला.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहूणे म्हणून वलचंदनगर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक रतिलाल चौधरी होते. ते मार्गदर्शन करताना म्हणाले की, विद्यार्थ्यानी जीवनात यश प्राप्त करायचे असेल तर प्रामाणिकपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे.याचे उत्तम उदाहरण म्हणजे मी होय.पोलीस शिपाई ते पोलीस उपनिरीक्षक या पदापर्यंतचा संपूर्ण जीवनपट त्यांनी विद्यार्थ्यां समोर मांडला. हे सर्व यश जे मला मिळाले त्याचे एकच कारण ते म्हणजे प्रामाणिकपणे काम करणे होय.त्यामुळे विद्यार्थ्यांनी कोणत्याही क्षेत्रात काम करीत असताना प्रामाणिकपणाला अतिशय महत्त्व द्यावे.असे अवाहन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रकाश पांढरमिसे होते.अध्यक्षीय मार्गदर्शन करताना ते म्हणाले, ज्याचे मन,मेंदू,मनगट अन् मनका कणखर असतो.त्याला अपयशाची चिंता कधीच भेडसावत नाही. आयुष्यात पुढे जाऊन उज्ज्वल भविष्याला गवसणी घालायची असेल तर डोळसपणे स्वप्न बघा. त्या दिशेने रममान होऊन वाटचाल करा. अशक्य वाटणाऱ्या गोष्टीचें रूपांतर शक्य गोष्टीत करता येईल. चौधर साहेबांसारख्या शून्यातून विश्व् निर्माण करणाऱ्या व जीवनात यश प्राप्त केलेल्या व्याख्यानाचे आयोजन इथून पुढे महाविद्यालयात केले जाणार आहे.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ. संजय मोरे यांनी केले.तर सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.बाबासाहेब चव्हाण तर आभार प्रा.सुवर्णा बनसोडे यांनी मानले.महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक प्राध्यापकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यां मोठ्या संख्येने उपस्थित होते.

