पुणे:- भोसरी पुणे येथील नारायण हट शिक्षण संस्थेच्या शाळेमध्ये मंगळवार दिनांक २७ जून 2023 रोजी सकाळी ९:३० ते १०:३० या वेळेत "आषाढी वारी" निमित्त पालखी सोहळ्याच्या आयोजन करण्यात आले होते.
शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर अध्यात्म, संत परंपरा, महाराष्ट्राची परंपरा, संस्कृती, ओळख व्हावी , चारित्र्याचा विकास व्हावा या उद्देशाने या पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
शाळेतील शिक्षकांनी टाकाऊ वस्तु पासून टिकाऊ आकर्षक पालखी मोठ्या परिश्रमाने बनवली होती.
पालखी सोहळ्याची सुरुवात पालखीचे प्रमुख अतिथींच्या हस्ते पूजन करून करण्यात आली.
या पालखी सोहळ्यामुळे संपूर्ण शालेयपरिसर भक्तीमय, आनंदी वातावरणात रंगून गेला होता .शाळेची सजावट रांगोळ्या काढून आकर्षक बनवण्यात आला होती.
पालखी सोहळ्यात प्रसन्न चेहऱ्याने आनंदी वातावरणात शालेय विद्यार्थी वारकरी पेहराव करून, भगव्या पताका हातात घेऊन, गळ्यात टाळ, मृदंग विना घेऊन सहभागी झाले होते. तर विद्यार्थिनी नऊवारी साड्या घालून डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन गळ्यात माळ घालून भजनात दंग झाले होते.
वारीमध्ये रिंगण सोहळ्यात फुगडी, गोल फेर, विठू नामाच्या गजरात साजरे करण्यात आले.
विठ्ठल रुक्मिणी, ज्ञानदेव तुकाराम, एकनाथ मुक्ताई यांच्या वेशभूषा विद्यार्थ्यांनी साकारल्या होत्या.
पालखी सोहळ्यात समाज प्रबोधनाच्या दृष्टिकोनातून पर्यावरण जागृती, आरोग्य जागृती, शिक्षण जागृती, स्त्रि- पुरुष समानता, अवयव दान, रक्तदान, अंधश्रद्धा निर्मूलन यासारख्या विषयांवर घोषणा देण्यात आल्या.
पालखी सोहळ्याचा समारोप प्रमुख अतिथी ह. भ. प . समाज प्रबोधनकार मा.दिगंबर ढोकले सर, ह. भ. प. मा. शंकर महाराज देवरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. त्यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना मार्गदर्शन केले.
या सोहळ्याचे नियोजन शाळेतील प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकांनी व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सायली संत यांनी मांनले तर आभार अंकुशराव गोरडे यांनी मानले.
कार्यक्रमासाठी नारायण शिक्षण संस्थेचे सचिव प्रा. डॉ. बाळासाहेब माशेरे, अध्यक्ष संदीप बेंडुंरे, रोहिदास गैंद, सौ.उज्वला थिटे, व इतर संढस्थेचे पदाधिकारी यांचेमोलाचे मार्गदर्शन लाभले.
नारायणा शिक्षण संस्था निगडी येथील "ज्ञान प्रबोधिनी "च्या विचारावर चालणारी संस्था असून शिक्षण व संस्कार यांच्या सुरेख समन्वय घडवून आणणारी व विद्यार्थी विकास साधणारी शाळा म्हणून अल्पावधीत सर्वत्र नावारूपास येत आहे.

