shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्रीक्षेत्र गोदावरी धाम सरला ते पंढरपूर पायी दिंडी सोहळा



शिरसगांव (वार्ताहर)
मठाधिपती श्रीक्षेत्र सरला बेट महंत रामगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सालाबादप्रमाणे श्रीक्षेत्र गोदावरी धाम सरला ते पंढरपूर पायी दिंडी सोहळा दिनांक १३ जून ते ३० जून या कालावधीत आयोजित करण्यात आला असून या पायी दिंडीचे प्रस्थान १३ जून रोजी होणार असून भास्करराव गलांडे पा. विद्यालय उंदीरगाव येथे दिंडीचा मुक्काम,दिनांक १४ जून उंदीरगांव, ब्राम्हणगांव, शिरसगांव,श्रीरामपूर मार्गे उत्सव मंगल कार्यालय श्रीरामपूर मुक्काम,दि.१५ जून रोजी श्रीरामपूर, बेलापूर देवळाली प्रवरा,मार्गे सहारा मंगल कार्यालय देवळाली मुक्काम,दि १६ राहुरी मार्गे राहुरी नगरपालिका केशररंग मंगल कार्यालय मुक्काम,दि १७- खडांबा व देहरे हायस्कूल मुक्काम,दि १८ –विळद,नगर मार्गे मधुबन मंगल कार्यालय वाकोडी येथे मुक्काम,दि १९-प्रियदर्शनी दुध संघ व व्यायाम शाळा,आंबीलवाडी मुक्काम,दि २०- थेरगांव,मिरजगांव,,भारत विद्यालय मिरजगांव मुक्काम.दि २१-श्री अमरनाथ विद्यालय कर्जत,दि २२ नालबंद मंगल कार्यालय नगर रोड करमाळा,दि २३- मलवडी [करमाळा] दि २४-राजू पा. येवले असो. सदस्य. एमआयडीसी,दि २५ सुवर्ण गार्डन मंगल कार्यालय करकंब मुक्काम, दि २६ जून ते २९ जून -पंढरपूर मठ येथे मुक्काम,दिंडी उतरण्याचे ठिकाण-सद्गुरू गंगागिरी महाराज मठ,दि २९ जून दुपारी ४ वाजता महंत रामगिरी महाराज यांचे हरिकीर्तन,शुक्रवार दि ३० जून रोजी सकाळी ९ वाजता गुरुवर्य महंत रामगिरी महाराज यांचे काल्याचे कीर्तन व महाप्रसादाने दिंडीची सांगता होईल. 


दिंडीत सहभागी होणाऱ्या वारकरी यांनी सरला बेट येथेच नोंदणी करावी त्यांनाच दिंडीत प्रवेश व पास मिळेल.वयवर्ष ६० वरील भाविकांना दिंडीत सहभागी होता येणार नाही.नियोजन समितीचे ह.भ.प.मधुकर महाराज, ह.भ..प.विकम महाराज मो.क्र ९५४५०१०९७१, डॉ.कोते मो.९८२२६५०७५३ व मांडलिक,दशरथ वर्पे,रवींद्र जाधव आदींशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

*समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर

close