shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शंभुराजे जगताप यांच्या विवाह सोहळ्याचे सर्वत्र कौतुक व स्वागत ...


कोणतेही राजकीय भांडवल न करता सर्व सामान्यांप्रमाणे विवाह संपन्न

प्रतिनिधी : सचिन जव्हेरी

करमाळा : ९ /   माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी आपले सुपुत्र शंभुराजे जयवंतराव जगताप यांच्या विवाह सोहळ्याचे कोणतेही राजकीय वलय निर्माण न करता अगदी सर्वसामान्य  कटुंबात मोठ्या आनंदात व उत्साहात विवाह सोहळा पार पाडतात अगदी त्याच धरतीवर त्यांनी घरातील शेवटचा विवाह असताना राजकीय वातावरण निर्मिती कोणतेही होवू न देता विवाह सोहळा पार पाडला याचीच संपुर्ण तालुक्यात मोठ्या कौतुकाने चर्चा होत आहे. 

        आपण नेहमी राजकीय कुटुंबातील कोणताही कार्यक्रम असता मोठा डामडौल,पुढारीच पुढारी असे पहात आलेलो आहोत,मग विवाह सोहळा म्हटले तर काय विचारूच नका. मात्र करमाळा येथील मोठे राजकीय घराणे असलेले,नव्हे राजकारणाच्या सुरूवातीचेच राजकीय घराणे म्हटले तर वावगे ठरणार नाही. आज जेवढे राजकीय पुढारी आहेत ते येथुनच म्हटले तरी चालेल. असे असताना माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी या विवाह सोहळ्यात येणारा प्रत्येकजणच आपल्यासाठी सन्मानीय आहे असे सर्वांशी हसतखेळत हस्तांदोलन करून स्वागत करताना दिसून येत होते. पंढरपूर येथे हा विवाह सोहळा असताना स्वयंस्फुर्तीने हजारो जयवंतराव जगतांपावर प्रेम करणारे सर्वच स्तरातील नागरिक हजर राहीले. त्यापेक्षा त्यांनी करमाळा शहरापासून दूर असलेल्या मंगल कार्यालयात स्वागत समारंभाचे आयोजन केलेले होते . या ठिकाणी तर अक्षरशः गर्दीचा महापुर रात्री उशिरापर्यंत दिसून आला. 

या सोहळ्याला राजकीय नेत्यांनी तर हजेरी लावलीच लावली त्याच बरोबर व्यापारी,शैक्षणिक,सामाजिक,विविध पक्ष संघटना,पत्रकार यांसह सर्वसामान्य नागरिक यांनी देखील आवर्जून आपली उपस्थिती दर्शविली. विशेष म्हणजे कोणाचीही ने-आण करण्याची सुविधा केलेली नव्हती हेच तर जगतापांचे वैशिष्ट्य असल्याची चर्चा कौतकाने लोक करत होते. 

करमाळा तालुक्यासह बार्शी, सोलापूर, पंढरपूर, बारामती, माढा येथील जगताप कुटुंबीयांवर प्रेम करणारी हजारो मंडळी उपस्थित होती.
भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार संजयमामा शिंदे, बारामती येथील ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पवार, बारामती ऍग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे, माजी आमदार नारायण पाटील, विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, बार्शी बाजार समितीचे सभापती रणवीर राऊत, सभापती प्रा. शिवाजी बंडगर, दत्तकला शिक्षण संस्थेचे प्रा. रामदास झोळ, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाशबापू पाटील, दशरथ कांबळे, नवनाथ झोळ, चंद्रकांत सरडे, किरण कवडे, सोलापूर डिसीसी बँकेचे माजी उपाध्यक्ष बबनराव अवताडे, जिल्हा परीषदेचे माजी उपाध्यक्ष दीपक गायकवाड, राजेंद्र बारकुंड, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे, आदिनाथ साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष वामनराव बदे, डॉ. प्रदीपकुमार पाटील, संतोष पाटील, सुभाष शिंदे, ऍड. भारत कट्टे, ऍड. अजित विघ्ने, विवेक येवले, श्री. लबडे आदींसह हजारोंच्या संख्येने या सोहळ्याला मंडळी उपस्थित होती. माजी आमदार जगताप, माजी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप, नारायण जगताप हे उपस्थितांचे स्वागत करत होते.

ऍड. कमलाकर वीर, माजी नगराध्यक्ष प्रशांत ढाळे, बाजार समितीचे सचिव विठ्ठलराव क्षीरसागर, पप्पू उकिरडे, बबनराव मेहेर आदींसह आजी- माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्य, बाजार समिती, खरेदी विक्री संघाचे, आदिनाथ साखर कारखान्याचे संचालक व विविध गावचे सरपंच, सोसायटी चेअरमन व सदस्य यांचेसह नागरीक बहुसंख्येने उपस्थित होते.

जयवंतराव जगताप यांना वास्तविक राजकारणासाठी या विवाह सोहळ्याचा फायदा करून घेता आला असता. अनेक मोठमोठे राजकीय पुढारी त्यांच्या आमंत्रणाचा स्वीकार करून आले असतेच. पण त्यांना कोणत्याही गोष्टीचे राजकीय भांडवल करणे आवडत नसल्याने त्यांना आपली राजकीय ताकद म्हणा अगर त्यांच्यावर प्रेम करणाऱ्याची संख्या ही करमाळा शहरात विवाह सोहळा ठेवून दाखवता आली असती. पण तसे करणे त्यांना आवडत नसल्याने त्यांनी दोन्ही कार्यक्रम शहरा बाहेर घेतले आहेत. त्यांच्या कार्यक्रमाचे त्यामुळे सर्वत्र स्वागत होत आहे.
close