shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याचे सुशोभिकरण व समाजमंदीर उभारणेकामी निधी उपलब्ध करावा - - शंभूराजे जगताप


खा . रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना लेखी निवेदनाद्वारे मागणी 

प्रतिनिधी : सचिन जव्हेरी 

करमाळा : ३ /   करमाळा शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या महापुरुषांच्या पुतळ्यां पैकी मंगळवार पेठेतील शहरवासियांचे श्रध्दास्थान असलेले क्षत्रीय महाराणा प्रताप यांच्या देखण्या पुतळ्याजवळ नगरपालिकेची मोठी खुली जागा आहे . पुतळ्या जवळचे कंम्पाऊंड  छोटे असल्या कारणाने रजपूत बांधवांच्या सामाजिक , सांस्कृतिक  व धार्मिक कार्यक्रमांकरिता सदर जागा अपूरी पडत आहेत . तसेच पुतळ्याचेही सुशोभिकरण करणे गरजेचे आहे . 

रजपूत बांधवांचे धार्मिक हित जोपासणे करता किमान १० लाख रु . निधी उपलब्ध करावा या मागणीसाठी तसेच सुतार गल्ली येथे  रजपूत समाज बांधव मोठ्या प्रमाणात आहेत . त्यांच्या सांस्कृतिक व धार्मिक  कार्यक्रमांसाठी मोठ्या समाज मंदिराची गरज आहे . या परीसरातही नगर पालिकेची भरपूर मोकळी जागा आहे . त्या करिता किमान दहा लक्ष  निधी मिळावा या मागणीचे निवेदन जगताप गटाचे युवा नेते शंभूराजे जगताप यांनी माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईकनिंबाळकर  यांना दिले आहे .यावेळी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजयजी मिश्रा, जगताप गटाचे पश्चिम भागाचे नेते आण्णासाहेब पवार आदी उपस्थित होते .
close