shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मुकुंदशेठ शहा हे एक सव्यासाची व्यक्तिमत्त्व - संदेश शहा.

मुकुंदशेठ शहा हे एक सव्यासाची व्यक्तिमत्त्व - संदेश शहा.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर शहर व परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी तन, मन तसेच धन खर्च करणारे निरपेक्ष व्यक्तिमत्त्व म्हणजे माझे मित्र मुकुंद गोकुळदास शहा होय. शेती, शिक्षण, सहकार, पर्यावरण संतुलन, आरोग्य, जल संवर्धन, धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक, युवा पिढी सक्षमीकरण आदी विविध क्षेत्र, शहर व तालुक्यातील प्रत्येक सकारात्मक उपक्रमात तन, मन, धनाने योगदान  देणारे कल्पक, दानशूर व्यक्तिमत्त्व म्हणजे मुकुंद होय. शेतीतील विविध प्रयोग,  गरीब घरातील युवापिढीची फी भरून त्यांना सुशिक्षित करून  आत्मनिर्भर करणे, सहकारात खाबुगिरी न होता शेतकऱ्यांचे प्रपंच संवर्धित व्हावेत म्हणून आग्रह धरणारे, मोफत रोपे घेवून जावा पण रोपे लावून ती जगवा असा लेखी आग्रह धरून लाखो झाडे लावून पर्यावरण संतुलन करणारे हे अभिनव व्यक्तिमत्त्व आहे. आंतरराष्ट्रीय रोटरी क्लबच्या माध्यमातून तालुक्यास फायदा मिळवून देण्यासाठी निरंतर प्रयत्नशील असणारे सव्यासाची व्यक्तिमत्त्व म्हणजे मुकुंद होय. स्पष्ट व रोखठोक बोलणे, सत्यमेव जयते या तत्त्वाने वागणारे मुकुंद शेठ नेहमी स्वार्थापेक्षा परमार्थाचे निरपेक्ष वृत्तीने आचरण करतात. त्यांच्या जीवनात अनेक कसोटीचे प्रसंग आले, त्यांना न केलेल्या गोष्टी मुळे अनेकदा कटू प्रसंगास सामोरे जावे लागले मात्र सत्य परेशान करता है, पराजित नही या तत्त्वावर त्यांचा गाढ विश्वास आहे. भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना या ब्रह्मकाव्या प्रमाणे ते वागत आहेत. भगवान महावीर यांच्या स्वतः आनंदाने जगा व इतरांना देखील आनंदाने जगवा या तत्वा प्रमाणे त्यांचे वागणे आहे. मात्र हे करताना काही जण विनाकारण दुखवले जावून त्यांच्या नावाने ओरडतात. त्यात काही प्रमाणात तथ्य असेल ही मात्र बहुजन हिताय, बहुजन सुखाय हा निर्णय  घेत असताना सर्वच गोष्टी सर्वांना पटतील असे नाही, काही बाबी नियमाला अपवाद असतातच. त्यांच्या टीका कारानी एक तर्फी विचार न करता अनेकांतवाद पद्धतीने सर्वसमावेशक पद्धतीने विचार करणे गरजेचे आहे. इंदापूर शहरास देश पातळीवर पोहचवण्यात त्यांचे मा.  नगराध्यक्षा सौ. अंकिता शहा यांच्याबरोबरच तमाम हितचिंतक इंदापूर करांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे.
 त्यांची राजकीय भूमिका वैयक्तिक आहे, मात्र समाजकारणातील ते राजहंस आहेत. त्यांच्या कार्याचा मी साक्षीदार आहे. आम्ही वर्गमित्र आहोत. मुकुंद शेठ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
ना सत्तेसाठी, ना प्रतिष्ठेसाठी,
ना राजकारणासाठी,
मुकुंद शेठ आहेत निरपेक्ष सेवेसाठी,
इंदापूर शहराच्या संपूर्ण विकासासाठी !
त्यांच्या कार्यास मनपूर्वक शुभेच्छा देवून त्यांना पुन्हा वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.
close