shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सौ.भाग्यश्री सौदागर यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार!!

प्रकाश मुंडे / बीड जिल्हा प्रतिनिधी  :-

केज तालुक्यातील आनंदगाव येथील सामाजिक चळवळीत अग्रेसर असलेल्या सौ भाग्यश्री हनुमंत सौदागर यांना महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने ग्रामपंचायत स्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.








भाग्यश्री सौदागर व डॉ हनुमंत सौदागर पतिपत्नी दोघांनी मागील सहावर्षांपूर्वी देहदान केलेले आहे ,दुष्काळ मुक्तीसाठी पाणी फाउंडेशन ची चळवळ,हागणदारी मुक्त गाव,ग्राम स्वच्छता मोहीम,स्मशानभूमी स्वच्छता आदी सामाजिक कार्याची  दखल घेऊन सरपंच अंजना गोविंद गायकवाड उपसरपंच आशाबाई शंकर शिंदे,ग्रामसेवक एस एल हेडगिरे ,मानवलोक चे इरफान शेख,पानी फाउंडेशन चे विनोद ठोंबरे,हरिश्चंद्र पांचाळ ,मुख्याध्यापक श्री वाळके ,ग्रामपंचायत सदस्य आदींच्या हस्ते सन्मानचिन्ह ,सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

गावातील जेष्ठ महिला शामलबाई गायकवाड यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

close