नवीन कार्यकारिणी लवकरच जाहिर होणार
प्रतिनिधी : संजय वायकर
नगर : 26 / आचार्य श्री विद्यासागर जी गुरुदेव यांचे सुशिष्य 1008 निर्यापक मुनी श्री वीरसागर जी गुरुदेव ससंघ यांनी अहमदनगर शहरातील पुरातन जैन मंदिराचे संदर्भात दोन समाजाचे दरम्यान बरेच वर्षेपासून चालू असलेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी दि. 22 जून 2023 रोजी अहमदनगर येथे बैठक घेऊन मार्गदर्शन केले व सदर वाद प्रेमपुर्वक संपुष्टात आल्याचे सर्व दिगंबर जैन श्रावक अहमदनगर यांना सांगितले .
यासाठी सैतवाल समाजाचे वतीने सर्व श्री भारतभूषण भागवत,संजय महाजन, श्रीकांत देशमाने,अनिल साखरे,डेरे साहेब, दिनानाथ देशमाने,शिरीष बेगडे,प्रमोद भाळवणकर,स्वप्नील साखरे, महावीर गोसावी आदिसह खंडेलवाल समाजाचे वतीने वर्धमान युवा संघ सह महावीर बडजाते,नरेन्द्र लोहाडे,रवि बाकलीवाल,नंदलालजी गंगवाल आदि मान्यवर उपस्थित होते .
यावेळी अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या पुढील विषयावर चर्चा होऊन वाद मिटल्याचे दोन्ही समाजाचे वतीने तिन्ही गुरुदेवांसमक्ष जाहीर करण्यात आले .
1) सैतवाल समाजाचे 4 प्रतिनिधी असतील .
2 ) खंडेलवाल समाजाचे 4 प्रतिनिधी असतील .
3) वरील दोन्ही समाजाचे व्यतिरिक्त इतर दिगंबर जैन समाजासाठी 3 प्रतिनिधी असतील .
4 ) अध्यक्ष व खजिनदार हे बारी बारीने सैतवाल व खंडेलवाल यांचे मधून तीन वर्षासाठी ज्या त्या समाजाचे मंदिर ट्रस्टी निवड करतील त्यामध्ये दुसऱ्या कोणाचाही समावेश राहणार नाही .
5) ही निवड 3 वर्षांसाठी राहील त्यानंतर ठरलेल्या कोट्यप्रमाणे आपआपला समाज आपले प्रतिनिधी नियुक्त करतील त्यामध्ये इतर समाज हस्तक्षेप करणार नाही .
6) दोन्ही समाजाचे प्रतिनिधी आपसात चर्चेतून समाजाचे व मंदिराचे विकासासाठी कार्य करतील .
7) नवे जुने वाद निर्माण करून अडथळा आणणार नाहीत .
8)मंदिराचा कार्यभार पारदर्शक राहील व वार्षिक हिशोब समाजाला दिला जाईल .
9) कार्यकाळ संपण्याच्या पूर्वी किंवा काळात एकमेकांच्या प्रतिनिधी ला काढून टाकण्याचा अधिकार फक्त त्यांच्याच समाजाला राहील त्यात इतर समाज हस्तक्षेप करणार नाही .
10) 23 जुलै 2023 पर्यंत ही नवीन ट्रस्टी नेमणूक करण्यात येईल व नंतर सर्व न्यायालयीन खटले मागे घेण्यात येतील .
या सलोख्यावर दोन्ही समाजाच्या वतीने मान्यवरांनी सह्या केलेल्या आहेत .

