शाहू महाराजांचे शासन लोक कल्याणकारी - भरतशेठ शहा.
इंदापूर प्रतिनिधी : युगप्रवर्तक श्री शाहू बहुउद्दशीय सेवा संस्थेच्या वतीने साठेनगर येथे शाहू महाराज जन्मोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन भरत शहा म्हणाले की, छ्त्रपती शाहू महाराजांनी लोक कल्याणकारी राज्य उभा केले.आणि खऱ्या अर्थाने गोर गरीब जनतेला न्याय दिला.
तसेच यावेळी
माजी नगरसेविका राजश्री मखरे म्हणाल्या की, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला मौलिक साथ देण्याचे काम छ्त्रपती शाहू महाराज यांनी केले.
यानंतर मा. नगराध्यक्ष विठ्ठलराव ननवरे म्हणाले की, मागासवर्गीयांना न्याय हक्क मिळवून देणारे राजे म्हणजे छत्रपती शाहू महाराज होय.
गटनेते कैलास कदम म्हणाले की, शाहू महाराज यांच्या कार्याची दखल भारतीय संविधानाला घ्यावी लागली आणि म्हणून महाराजांचे नाव देशात स्वाभिमानाने घेतले जाते.
या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करुन यावेळी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून महाराजांना अभिवादन करण्यात आले.
युगप्रवर्तक श्री शाहू सेवा संस्थेचे वतीने गेली अखंड ८ वर्ष इंदापूर तालुक्यातून महाराजांची जयंती मिरवणुकीसह विविध उपक्रमांनी साजरी केली जात असून डॉ.आंबेडकरनगर येथील अंगणवाडी येथे बाल चीमुंना खाऊ वाटप करण्यात आला.
यावेळी सामाजिक कार्यकर्त्या रेश्मा शेख, माजी नगरसेवक दादासाहेब सोनवणे,प्रा. कृष्णा ताटे , आर.पी.आय जिल्हा सचिव संदीपान कडवळे, वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष सुभाष खरे, मा.नगरसेवक शेखर पाटील, हमीद अतार, महादेव चव्हाण सर, शाहू संस्थेचे अध्यक्ष शिवाजी शिंदे,बाळासाहेबअडसूळ ,चंद्रकांत सोनवणे, अमोल खराडे, सुधीर पासगे, खंडेराव मखरे,सत्यवान शिंदे, लांडगे साहेब, वांचीतचे राहुल मखरे व वस्ताद आकाश कांबळे , आदी उपस्थित होते.

