*१० जुन रोजी होणार पुरस्काराचे वितरण
श्रीरामपूर प्रतिनिधी:
येथील बोरावके नगरमधील विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानतर्फे स्व.ॲड.रावसाहेब शिंदे यांच्या ९५ व्या जयंतीनिमित्त (१० जून २०२३ रोजी) रयत शिक्षण संस्थेचे माजी मॅनेजिंग कौन्सिल सदस्य व बोरावके कॉलेजचे सेवानिवृत्त प्रा. विठ्ठलराव पाचारणे यांना स्व. ॲड,रावसाहेब शिंदे स्मृती जीवनगौरव राज्यस्तरीय पुरस्कार आणि सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. दिलीप शिरसाठ यांना डॉ.वा.ग.तथा डॉ. बाबासाहेब कल्याणकर स्मृती धन्वनतरी राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाले आहे, सदरील पुरस्कार हे दि.१० जुन २०२३ रोजी वितरण करण्यात येणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक, सचिव सुखदेव सुकळे यांनी दिली.
शनिवार दि. १० जून २०२३ रोजी सकाळी १० वाजता महादेव मळा येथील विद्यानिकेतन शाळेत पुरस्कार वितरणसोहळा आयोजित करण्यात आला आहे. विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य डॉ. राजीव रावसाहेब शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य प्रा. डॉ. सदाशिव कदम उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष माजी प्राचार्य टी. ई. शेळके, मार्गदर्शक व समन्वयक डॉ. बाबुराव उपाध्ये, संस्थापक, सचिव सुखदेव सुकळे आदिंनी केले.
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर

