shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बावडा येथे २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बावडा येथे २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा
 इंदापूर प्रतिनिधी: श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बावडा येथे २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला.
पतंजली योग परिवार इंदापूरचे श्री माने  व श्री बोराटे  यांनी विविध योगासनाचे प्रात्यक्षिक केले. यावेळी सर्व विद्यार्थी व शिक्षक वृंद यांनी सहभाग घेतला.
       प्राचीन भारतीय संस्कृती परंपरा यामध्ये योग योगासने योग साधना यांना अनन्य साधारण महत्त्व आहे. प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात योगाचा अंतर्भाव करावा आपल्या आरोग्याच्या सुदृढतेसाठी हे गरजेचे आहे अशा प्रकारचे महत्त्व पटवून दिले.
    यावेळी प्राचार्य श्री घोगरे डी आर सर, उप प्राचार्य श्री जगताप जीजे सर, पर्यवेक्षक श्री हासे सर, श्री बनकर सर, सर्व विद्यार्थी शिक्षक शिक्षिका व इतर कर्मचारी उपस्थित होते.
     यावेळी प्राचार्यांच्या हस्ते श्री माने  व श्री बोराटे यांचा सन्मान करण्यात आला.
प्राचार्य श्री घोगरे डी.आर.सर श्री पाटील सर श्री जाधव सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
श्री जगताप जी जे सर यांनी आभार मानले. तर श्री मुलाणी एस टी सर यांनी सूत्रसंचालन केले.
close