पिंपळनेर -- सामोडे प्रतिनिधी दिलीप घरटे:
पिंपळनेर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे गुजरात राज्यात जाणारा देशी- विदेशी कंपनीचा मद्यसाठा व वाहन जप्त करून कारवाई केली आहे.मा. पोलीस अधीक्षक श्री संजय बोरकुंड सो धुळे यांनी मासिक गुन्हे आढावा बैठकी दरम्यान अवैद्य धंदेबाबत तसेच आंतरराज्य मद्य तस्करीचे समूळ उच्चाटन करणे बाबत विशेष सूचना दिल्या होत्या,त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन हद्दीतील आंतरराज्य तसेच अंतर जिल्हा सीमांवर वेळोवेळी पेट्रोलिंग ,नाकाबंदी लावण्यात येऊन तसेच गोपनीय बतमीदारकडून माहिती प्राप्त करण्यात येत होती.काल दिनांक ९/६/२०२३ रोजी रात्रीचे ८.३० वा सुमारास आंतरराज्य सीमा भागात पेट्रोलिंग सुरू असताना सपोनि सचिन साळुंखे यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली.
खात्रीशीर बातमी मिळाल्याने स्टाफ सह पेट्रोलिंग करत असताना मळगाव शिवारात कळंब बरीत संशयित वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला असता सदर वाहनवरील चालकाने काही अंतरावर जंगल परिसरात अंधाराचा फायदा घेत वहान सोडून पळून गेला सदर वाहणाजवळ जाऊन पाहिले असता वाहन क्र. जी जे २७ बी एस ६४८७ असा असून सादर वाहन लॉक करून पाळल्याचे दिसून आले.सदर वाहनांची तपासणी करता त्यात देशी - विदेशी मालाचा अवैधरित्या माल भरून चोरटी वाहतूक होत असल्याचे निरदर्शनस आले. सदर मुद्देमालची व वाहनाची किंमत एकूण ११,७२,२००/-जप्त करण्यात आला.त्याबाबत पिंपळनेर पोलीस स्टेशन ला सी सी टी एन एस गुरण १४५ /२०२३ महाराष्ट्र दारूबंदी कलाम 65 (अ) ( ई ) गुन्हा दाखल करण्यात आला असून पुडील तपस अ स इ बी आर पिंपळे करीत असून सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक संजय बोरकुंड सो ,मा पोलीस अधीक्षक श्री किशोर काळे,उपविभागीय पोलीस अधिकारी संभाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाययक पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे,पोसइ भाईदास मालाचे ,लक्ष्मण गवळी,पो हे कॉ कांतीलाल अहिरे,प्रकाश सोनवणे,संदीप पवार,राकेश ,पंकज माळी,कैलास कोळी,विजयकुमार पाटील,रवींद्र सूर्यवंशी,पंकज वाघ,नरेंद्र परदेशी यांचा समावेश होता.

