shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

संत मुक्ताबाई पालखी सोहळ्यात जाधव परिवाराकडून अन्नदान

संत मुक्ताबाई पालखी सोहळ्यात जाधव परिवाराकडून अन्नदान

इंदापूर प्रतिनिधी: 

क्षुधेलिया अन्न ! दयावे पाञ न विचारून !! धर्म आहे वर्मा अंगी ! कळले पाहीजे प्रसंगी !! द्रव्य आणि कन्या ! येथे कुळ कर्म शोधण्या !! तुका म्हणे पुण्य गांठी ! तरीच ऊचिताची भेटी !! 
सदरील अभंगात तुकोबारायांनी अन्नदानाचे महत्व सांगीतले आहे.दान धर्मापेक्षा भुकेलेल्याला केलेले अन्नदान हे कधीही चांगलेच असल्याचे सांगीतले आहे. तुकोबाराय म्हणतात भुकेल्या व्यक्तीला अन्नदान करावे. गरजू असलेल्या व्यक्तीचे पोट भरावे. हे अन्नदान करतांना तो कोण आहे विचारू नये,पाहू नये. यातच खरा धर्म आहे. भुकेल्याला अन्नदान म्हणजेच खरया धर्माचे वर्म होय. हे वेळप्रसंगी माणसाला कळले पाहीजे. म्हणजेच तुकोबाराय भुकेल्या व्यक्तीला पोटभर जेऊ घालणे हाच धर्म असल्याचे सांगतात.
 आषाढी एकादशी निमित्त पंढरीच्या दिशेने जाणाऱ्या वैष्णवांच्या मेळ्यात सहभागी होणे, त्यांच्या सेवेची संधी मिळणे हा मोठे भाग्य असते.गेली ३ वर्षा पासुन श्री क्षेत्र शेळगाव ते पंढरपुर संत मुक्ताबाई पालखी सोहळा मोठ्या दिमाखात निमगाव केतकी मार्गे पंढरीनगरी कडे विठोबाच्या गजर नामाने मोठ्या प्रमाणात शेळगाव परिसरात तील विठ्ठल भक्त जात असतात. या निमित्ताने निमगाव केतकी येथील  जाधव परिवार व  तुषार (बाबा) जाधव  मित्र परिवाराच्या वतीने वारकऱ्यांची मन:पूर्वक सेवा होत आहे. हजारो वारकऱ्यांना अन्नदान करून खऱ्या अर्थाने सामाजिक कर्तव्य पार पाडण्याचे काम या माध्यमातून होत असते. निमगाव केतकी येथील श्री संत सावता माळी मंदिराच्या आवारात अन्नदान करण्यात आले. संत तुकाराम पालखी सोहळा निमगाव केतकी या ठिकाणी मुक्कामी असतो. याही वेळी जाधव परिववार तसेच तुषार (बाबा) जाधव मित्र परिवाराकडून हजारो लोकांना अन्नदान केले जाते.
पालखी सोहळा निमगाव केतकी या ठिकाणी  दाखल होताच इंदापूर अर्बन बँकेचे चेअरमन देवराज जाधव पंचायत समितीचे माजी सभापती अंकुश जाधव, इंदापूर मार्केट कमिटीचे संचालक तुषार जाधव, ग्रामपंचायत सदस्य सचिन जाधव देवराज नागरी पतसंस्था अध्यक्षा सोनाली जाधव यांच्या सह ग्रामस्थांनी पालखी सोहळ्यात चे स्वागत केले. यावेळी बोलताना तुषार जाधव म्हणाले की, ही अन्नदानाची परंपरा अशीच कायम चालू ठेवणार आहे.
यावेळी अष्टविनायक सहकारी पतसंस्थेचे सचिव वैभव मोरे, नंदकुमार चकोर, विजय पवार, रमेश घाडगे, चेतन घाडगे, मकरंद हेमाडे यांच्यासह अष्टविनायक ग्रुपचे सर्व सदस्य . अष्टविनायक, सिध्दिविनायक, मयूरेश्वर देवराज पतसंस्थेचे कर्मचारी तसेच निमगाव केतकी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
close