shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर तालुक्यातील ग्रामपंचायतींना रु.1 कोटी 19 लाखाचे व्यायामशाळा साहित्य- हर्षवर्धन पाटील.

इंदापूर तालुक्यातील ग्रामपंचायतींना रु.1 कोटी 19 लाखाचे व्यायामशाळा साहित्य-  हर्षवर्धन पाटील.
 इंदापूर : प्रतिनिधी दि.29/7/23
               इंदापूर तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींना व विद्यालयांना रु.1 कोटी 19 लाखाचे व्यायामशाळा साहित्याचे वाटप पुणे जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना 22-23 व अनुसूचित जाती उपाय योजना सन 2022- 23 मधून सध्या सुरु करण्यात आले आहे, अशी माहिती भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शनिवारी (दि.29)दिली.
          सदर व्यायामशाळा साहित्य मंजूर केले बद्दल जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे हर्षवर्धन पाटील यांनी आभार मानले. आगामी काळात इंदापूर तालुक्यातील विकास कामासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, असे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.
• जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण सन 2022-23  मधून व्यायामशाळा साहित्य मिळालेल्या ग्रामपंचायती व विद्यालये पुढील प्रमाणे :-
१) ग्रामपंचायत भिगवण - व्यायाम शाळा साहित्य - 7 लाख, २) ग्रामपंचायत अकोले धायगुडेवाडी - ओपन जिम साहित्य - 7 लाख, ३) पळसनाथ विद्यालय पळसदेव व्यायामशाळा साहित्य 7 लाख, ४) ग्रामपंचायत गोंदी- ओपन जिम  साहित्य 7 लाख, ५) ग्रामपंचायत म्हसोबावाडी व्यायाम शाळा साहित्य 7 लाख, ६) ग्रामपंचायत भोंडणी- ओपन जिम साहित्य 7 लाख, ७) लोकनेते शहाजीराव पाटील विद्यालय बोराटवाडी व्यायामशाळा साहित्य 7 लाख, ८) प्रगती विद्यालय लोणी देवकर व्यायाम शाळा साहित्य 7 लाख, 9) ग्रामपंचायत निमसाखर रूणमोडे वस्ती व्यायाम शाळा साहित्य 7 लाख, १०)  ग्रामपंचायत अकोले व्यायाम शाळा साहित्य 7 लाख.
• जिल्हा वार्षिक योजना अनुसूचित जाती उपाय योजना सन 2022 23 व्यायाम शाळा साहित्य मिळालेल्या ग्रामपंचायती व विद्यालये : -
 १) महात्मा फुले विद्यालय बिजवडी व्यायाम शाळा साहित्य 7 लाख, २) ग्रामपंचायत भिगवण संत रोहिदास चर्मकार वस्ती व्यायामशाळा साहित्य 7 लाख, ३) ग्रामपंचायत रेडणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडा भवन व्यायाम शाळा साहित्य 7 लाख, ४) ग्रामपंचायत रुई कांबळे वस्ती व्यायाम शाळा साहित्य 7 लाख, ५) ग्रामपंचायत वालचंदनगर मेन कॉलनी दलित वस्ती व्यायाम शाळा साहित्य 7 लाख, ६) कस्तुरबा बी.सी. बोर्डिंग इंदापूर व्यायामशाळा साहित्य 7 लाख, ७) श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ विद्यालय बावडा व्यायाम शाळा साहित्य 7 लाख. दरम्यान, हर्षवर्धन पाटील यांनी तरुण वर्गाच्या मागणीनुसार व्यायाम शाळा साहित्य उपलब्ध करून दिल्याने, तरुण वर्गामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

close